Tanaji Sawant  
महाराष्ट्र

Tanaji Sawant: तानाजी सावंतांसाठी 'सागर'चे गेट बंद; मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली?

Tanaji Sawant: तानाजी सावंत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी गैरहजर होते. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाला तानाजी सावंत यांनी उपस्थिती लावली.

Bharat Jadhav

माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासाठी सांगर बंगल्याची दारे बंद? असा प्रश्न उपस्थित होण्यामागचे कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ दिली नसल्याची चर्चा आहे. मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे नाराज असलेले माजी मंत्री तानाजी सावंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले.मात्र त्यांना बंगल्याच्या प्रवेशद्वारावरच थांबविण्यात आलं.

काही वेळ सावंत यांना प्रतिक्षा करावी लागली. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची भेट नाकारल्याचे वृत्त आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मंत्रिपदाच्या काळात घेतलेल्या निर्णयावर सरकारने चौकशीचे आदेश दिलेत. त्याचबरोबर सरकारमध्ये असताना तानाजी सावंत यांनी काही कंत्राटांची निविदा काढली होती. आर्थिक तरतूद नसतानाही या कामाची निविदा काढण्यात आली होती. त्याचमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित निविदेला स्थगिती दिलीय, अशी चर्चा आहे.

त्याचमुळे सावंत कमालीचे नाराज आहेत. त्यानंतर तानाजी सावंत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते. तानाजी सावंत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी गैरहजर होते. मात्र सोमवारपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला तानाजी सावंत यांनी उपस्थिती लावली. पहिल्याच दिवशी त्यांनी कामकाजात सहभाग नोंदवला. विधानसभेचे कामकाज आटोपल्यावर ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेले.

परंतु त्यावेळी देवेंद्र फडणवीस भाजपच्या इतर मंत्र्यांसोबत बैठकीत व्यस्त होते. भेटीसाठी आलेल्या तानाजी सावंत यांना सागर बंगल्याच्या गेटवर थांबवण्यात आले. त्यानंतर काही मिनिटात त्यांची भेट नाकारण्यात आली. त्यामुळे हिरमुसलेले सावंत भेटीविना माघारी वळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

SCROLL FOR NEXT