CM Devendra Fadnavis News  Saam tv
महाराष्ट्र

CM Fadnavis: 'वारंवार असं चालणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस शिंदे गटाच्या आमदारावर संतापले

Chief Minister Fadnavis Angry On MLA Sanjay Gaikwad: महाराष्ट्र पोलिसांबाबत संजय गायकवाड यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खडेबोल सुनावलेत.

Bharat Jadhav

शिंदे गट शिवसेनेच्या आमदारावर मुख्यमंत्री फडणवीस संतापले आहेत. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला होता. शिवाय पोलीस खात्यात भ्रष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्याप्रकरणी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गायकवाड यांना तंबी दिलीय.

आमदार गायकवाड यांची तक्रार थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली जाणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिलीय. एकनाथ शिंदेंनी त्यांना कडक शब्दात समज द्यावी, असं फडणवीस म्हणालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आसावरी जगदाळे यांची भेट घेतली. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार संजय गायकवाड यांना खडेबोल सुनावलेत.

याशिवाय आपण त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री शिंदेंकडे करणार असल्याचं सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संजय गायकवाड यांच्याबद्दल आपण सांगणार आहोत. त्यांनी गायकवाड यांना कडक शब्दात समज द्यावी, हे वारंवार असं चालणार नाही, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.

मुख्यमंत्री फडणवीस का संतपाले?

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. पण त्यांचे असं विधान करणं आता मुख्यमंत्री फडणवीस यांना खटकू लागलंय. वारंवार असं बोलणं खपवून घेतलं जाणार नसल्याच मुख्यमत्री म्हणालेत. शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसात भ्रष्ट्राचार असल्याचा आरोप करत सरकारला घरचा आहेर दिला होता. त्यावरून आज फडणवीस यांनी त्यांना खडेबोल सुनावलेत.

आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. ‘महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात नाहीये. त्यांच्या या विधानावरून फडणवीस कमालीचे संतापले आहेत. संजय गायकवाड यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी आमदार अर्जुन खोतकरांसह त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आली याबाबत प्रश्न केला होता. यावर संजय गायकवाड यांनी म्हणाले की, “आम्हाला धमक्या येतात. जे समाजात चांगलं काम करतात, त्यांना धमक्या येत असतात. पोलीसवाले काही करू शकत नाहीत.

माझ्या घरची गाडी उडवण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा पोलिसांकडून काय चौकशी झाली? काहीही चौकशी झाली नाही”, असं संजय गायकवाड म्हणाले. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात कुठेही नाहीये. शासनाने कोणताही कायदा केला की पोलिसांचा एक हप्ता वाढत असतो, असं संजय गायकवाड म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

SCROLL FOR NEXT