Suresh Dhas Pankaja Munde Saam Tv
महाराष्ट्र

Beed Politics : 'देवेंद्र बाहुबली, पंकजा शिवगामी', पंकजा-धसांमध्ये स्टेजवरच कलगितुरा; VIDEO

Suresh Dhas Pankaja Munde : सुरेश धस आणि पंकजा मुंडेंमध्ये फिल्मी डायलॉगबाजीचा कलगितुरा रंगला. हा कलगितुरा कसा रंगला आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंना काय इशारा दिलाय? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

सरपंच हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात आले. विशेष म्हणजे आष्टीतल्या कार्यक्रमात एकमेकांवर तोफ डागणारे सुरेश धस आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर आले. या कार्यक्रमात सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यात फिल्मी डायलॉगने स्टेजवर जोरदार जुगलबंदी रंगली. यावेळी धसांनी फडणवीसांचा उल्लेख बाहुबली असा केला तर हाच धागा पकडून फडणवीस बाहुबली तर आपण शिवगामी असल्याचं म्हटलं.

एवढंच नाही तर धस न मिळालेल्या मंत्रिपदाचाही उल्लेख करायला विसरले नाहीत.. मात्र मंत्रिपद नव्हे आपल्याला पाण्याची गरज असल्याचं सांगून दिवारमधली डायल़ॉगबाजी करत फडणवीसांच नव्हे तर उपस्थितांचीही मनं जिकली.

स्टेजवर रंगलेल्या कलगितुऱ्यानंतर धसांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख करत राख, वाळू उपसणाऱ्यांवरही मकोका लावण्याची मागणी सुरेश धसांनी केली.. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुणी कितीही मोठा असला तरी कारवाई करणारच, असं म्हणत फडणवीसांनी मुंडेंचं नाव न घेता थेट इशारा दिलाय.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापुर्वी धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली होती. आपल्या डोळ्याच्या ऑपरेशनचं कारण देत मुंडे गैरहजर राहिले. मात्र धसांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारांना जाहीर इशारा दिल्यामुळे मुंडेंच्या अडचणीत वाढ होणार की मुंडेंना अभय मिळणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT