Chhava workers being assaulted during MP Sunil Tatkare’s press meet, triggering political outrage across Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

NCP vs Chhava Showdown: खासदार सुनील तटकरेंसमोर पत्ते फेकणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्यानंतर राज्यात छावा विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पेटला. राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांना राजीनामा द्यावा लागलाय.

Suprim Maskar

ही दृश्य बिहारची नाहीत....आपल्याच महाराष्ट्रातील आहेत.. चक्क लाथाबुक्क्यांनी रक्त येईपर्यंत छावा संघटनेंच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलीये...खासदार सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकून कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली म्हणून छावा संघटनेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली..

या मारहाणीत आघाडीवर होते, राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण...या मारहाणीनंतर छावा संघटनेने धाराशिव, नांदेड, लातूर, संभाजीनगरमध्ये जोरदार निदर्शनं केली...राष्ट्रवादीनं सत्तेचा माज दाखवलाय, अशी टीका मारहाणीत जखमी झालेल्या विजय घाडगे यांनी केलीय..

दुसरीकडे या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादीच्या वरीष्ठांनी सुरज चव्हाण यांना राजीनाम्याचे आदेश दिले. दरम्यान, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे-पाटील यांना मारहाणीमुळे छातीत दुखू लागल्यानं ICU मध्ये हलवण्यात आलं. त्यातच सुरज चव्हाणांनी वाढता विरोध लक्षात घेता विजय घाडगेंची भेट घेऊन गैरसमज दूर करणार असल्याचं म्हटलंय.

आमदार निवासातील कँटिन कर्मचाऱ्याला मारहाण, विधानभवनातील हाणामारी आणि आता छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना खासदारासमोरच मारहाण.. सत्ताधारी नेत्यांच्या या कृत्यामुळे विरोधकांनीही संताप व्यक्त केलाय..

गेल्या काही दिवसांतील घटना पाहता राजकारणात स्तर घसरतोय, अशी टीका सर्वसामान्यांमधूनही होतेय. सत्ताधाऱ्यांची प्रतिमा मलीन होत असताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पदाधिकारी, नेत्यांना समज देणार का? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

Ganpati Visarjan 2025: मुंबई ते दिल्ली गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी 'हे' आहेत शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका; 10 दिवसांची पुजा ठरेल व्यर्थ

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT