Amol kolhe Statement  Saam Tv
महाराष्ट्र

Chhaava Movie News : संभाजी मालिकेच्या शेवटावरून दबाव होता, अभिनेते अमोल कोल्हेंचा खळबळजनक दावा

swarajyarakshak sambhaji News : मालिकेत छत्रपती शंभूराजेंना कैद झाल्यानंतर पुढे औरंगजेबाने त्यांचा कसा छळ केला, हे दाखवण्यात आलं नाही. या मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला अशी चर्चा रंगली. याविषयी डॉ. अमोल कोल्हेंनी खळबळजनक खुलासा केला आहे.

Namdeo Kumbhar

Chhaava Movie News : विकी कौशल याचा छावा चित्रपट रिलीज झाला.'छावा' सिनेमाचा विषय आणि वेदनादायी क्लायमॅक्स पाहून सर्वांचे डोळे पाणावले. शिवप्रेमींनी या चित्रपटाला पसंती दर्शवली, अशातच गेल्या काही दिवसांमध्ये 'छावा' निमित्ताने डॉ. अमोल कोल्हेंच्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' (swarajyarakshak sambhaji) मालिकेची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. कारण या मालिकेत छत्रपती शंभूराजेंना कैद झाल्यानंतर पुढे औरंगजेबाने त्यांचा कसा छळ केला, हे दाखवण्यात आलं नाही. या मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला अशी चर्चा रंगली. याविषयी डॉ. अमोल कोल्हेंनी खळबळजनक खुलासा केला आहे.

आजपर्यंत इतिहासातून छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीचे षडयंत्र रचल्याचा दावा यापूर्वी अमोल कोल्हेंनी केला होता. त्यावर आता जगदंब क्रिएशन्स प्रस्तुत स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांचा शेवट दाखविण्यासाठी अभिनेता अमोल कोल्हे यांच्यावर दबाव होता, असा दावा करण्यात आला आहे. या पूर्वीच्या इतिहासकारांनी लिहिलेल्या पुस्तकातील लिखाण चुकीचं केल्याचा दावा करत थेट आरोप केले आहेत. त्यातच स्वराज्य रक्षक या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांचा शेवट दाखविण्यासाठी दबाब होता. त्यामुळे या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांचा शेवट दबावामुळे चुकीचा दाखवला का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

बदनामीचे षडयंत्र, कोल्हेंचा गंभीर आरोप..

विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांविषयी टाकलेला मजकूर हा षडयंत्राचा भार असल्याचा गंभीर आरोप आता खासदार अमोल कोल्हे यांनी केला होता. छावा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने छत्रपती संभाजी महाराजांविषयी हिंदी भाषिक लोक इंटरनेटवरुन माहिती गोळा करतील, त्यावेळी विकिमिडियाच्या माहितीचा आधार घेतला जाणार याची पूर्व कल्पना लक्षात घेऊन जाणून बुजून छत्रपती संभाजी महाराजांविषयी चुकीची माहिती पुन्हा विकिपीडियावर टाकण्यात आल्याचा आरोप, खासदार अमोल कोल्हे यांनी केला.

अमोल कोल्हेंनी आत्ताच हा खुलासा का केला?

1 - माझ्यावर माध्यमाचा दबाव होता. मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यास नियमावलीचे पालन करणं बंधनकारक असतं. त्या नियमांमुळं छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव आला.

2 - नैतिकतेचा ही माझ्यावर दबाव होता. सलग चाळीस दिवस टीव्ही मालिकेवर महाराजांचं बलिदान दाखवलं असतं तर प्रत्येक कुटुंबातील आबालवृद्धांवर याचा परिणाम दिसला असता. हा विचार आम्ही करणं गरजेचं होतं.

3 - आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतू वर प्रश्न उपस्थित केले गेले. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान पाहून तुम्हाला कोणता आनंद मिळणार होता का? असा प्रश्न मी आमच्या हेतुवर शंका घेणाऱ्यांना विचारतोय? मला अशा ट्रोलर्सची कीव येते.

4 - 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवावा, अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती. मुळात त्यांनी ही मालिका कोरोना काळात पुनर्प्रक्षेपन केलं तेंव्हा पाहिली, त्यामुळं 2019च्या लोकसभेवेळी मालिकेत काय दाखवलं जातंय, याची कल्पना पवार साहेबांना अजिबात नव्हती. असा खुलासा कोल्हेनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले, प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा 22k अन् 24k गोल्डच्या आजच्या किंमती

Diabetes First Symptom: डायबेटिसचं पहिलं लक्षण दिसतं आपल्या डोळ्यात, नेमके काय बदल होतात? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजितदादा राज्याचे लवकरच मुख्यमंत्री होतील- आमदार अमोल मिटकरी

Health Tips : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या ५ गोष्टी कराच, आरोग्य राहिल उत्तम

Manikrao Kokate: निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का; माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द?

SCROLL FOR NEXT