महाराष्ट्र

महाराष्ट्रातील प्रसिद्ध युट्युबर, इन्स्टाग्रामवर ३ लाख फॉलोवर्स; ड्रग्ज तस्करी करताना रंगेहाथ सापडला

snake catcher akash jadhav : महाराष्ट्रातील प्रसिद्ध युट्युबर आणि इन्स्टाग्रामवर ३ लाख फॉलोवर्स असलेल्या तस्काराला पोलिसांनी रंगेहाथ पकडला आहे.

Vishal Gangurde

छत्तीसगड पोलिसांची ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई

सोशल मीडिया स्टार, सर्पमित्र आकाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

आकाश जाधव युट्युब आणि इन्स्टाग्रामवर लोकप्रिय

छत्तीसगडच्या महासमुंद पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. युट्युबवर ५६ लाख ८० हजार सबस्क्राइबर, इन्स्टाग्रामवर ३ लाख १७ हजार फॉलोवर्स असलेला सोशल मीडिया स्टार, सर्पमित्राला पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात कारवाई केली आहे. आकाश जाधव असे अहिल्यानगरमधील आरोपीचे नाव आहे. छत्तीसगड पोलिसांनी आकाश जाधववर मोठी कारवाई केली आहे.

'आज तक'च्या वृत्तानुसार, महासमुंद पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान एक रुग्णवाहिका अडवली. या रुग्णवाहिकेत पोलिसांना २ कोटी ६० लाखांचा ५ क्विंटल २० किलोंचा गांजा सापडला. पोलिसांनी या कारवाईदरम्यान ९ लोकांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी युट्युबर आकाश जाधवचा समावेश आहे. सर्पमित्र आकाश जाधव याचं नाव सोशल मीडियावर चर्चेत असायचं.

पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश जाधव हा सापांना रेस्क्यू करून जीव वाचवायचा. सर्पमित्र आकाश जाधव हा दुसऱ्या बाजूला गांजा तस्करी करत असल्याचे उघड झालं आहे. त्याचा या तस्करीत मोठा हात होता. महासमुंद पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी सांगितलं की, 'अँटी नारकोटिक्स टास्क फोर्स आणि कोमाखान पोलीस स्टेशनमधील कर्मचारी यांच्या संयुक्त कारवाईत ५ क्विंटल २० किलो गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईत एकूण ९ जण सामील होते. त्यात अहिल्यानगरच्या आकाश जाधवाचाही समावेश आहे

युट्युब आणि इन्टाग्रामवर आकाश जाधव चर्चेत असायचा. आकाश जाधव सापांचंही रेस्क्यू करायचा. तो त्याचा साइड बिझनेस असायचा. परंतु तस्कर गांजा ओडिशातून महाराष्ट्रात आणायचे. मागील वर्षभरात तस्करांनी ६ ते ७ वेळा ओडिशातून महाराष्ट्रात गांजा आणला गेला आहे. या प्रकरणात आकाश जाधववर कारवाई केल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील आणखी किती जण संबंधित असल्याचे सापडतात, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT