Chhatrapati Shivaji Maharaj's Wagh Nakh to be brought in Satara soon Saam TV
महाराष्ट्र

'Wagh Nakh': ठरलं तर मग! छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं थेट राजधानी साताऱ्यात, कधी येणार? (पाहा व्हिडिओ)

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh nakh to be brought in Satara soon: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शाैर्याचा इतिहास जास्ती जास्त नागरिकांपर्यंत पाेहचविण्यासाठी राज्य सरकार विविध उपक्रम राबवित आहे.

ओंकार कदम

अफजलखानचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी वाघ नखं वापरली ती वाघ नखं जुलैमध्ये भारतात आणली जाणार आहेत. इंग्लंडहून आणली जाणारी वाघ नखं सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे नागरिकांना पाहता येणार आहेत.

इतिहासाच्या अनेक शिवकालीन घडामोडी सातारा जिल्ह्यात घडल्या. यामध्ये अनेक इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दुर्मिळ वस्तू साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. याचे काम अंतिम टप्प्यात आहे

विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला की वाघ नखं इंग्लंडहुन प्रथमच साताऱ्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात येणार आहेत. याबाबतची माहिती छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. ते म्हणाले यासाठी संग्रहालयात वाघनखांचे स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान

Plane Crash News : भयंकर! उड्डाण घेताच काही सेकंदात विमान कोसळलं, ५ विद्यार्थ्यांसह ११ जणांचा मृत्यू

Early kidney cancer: शरीरात दिसणारे हे ५ बदल सामान्य समजताय? किडनी कॅन्सरची सुरुवातीची धोकादायक चिन्हं असू शकतात

Crime: संभाजीनगर हादरले! रॅप साँग गाण्यावरून कडाक्याचे भांडण, १० जणांनी धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवलं

Rain Alert : पावसानं जोर पकडला, पुढचे २४ तास महत्वाचे; मुंबई- पुण्यासह ३० जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT