५ हजारांची साडी ५९९ रुपयांच्या ऑफरमुळे महिलांची तुफान गर्दी
चेंगराचेंगरीत ३ महिला बेशुद्ध
लहान मुलांची आईपासून ताटातूट झाली
जवाहरनगर पोलिसांच्या तातडीने हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली
माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर
महिलांसाठी साडी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे. या साड्यांसाठी महिलांची लगबग आपण नेहमीच पाहतो. साड्यांसाठी एखादी ऑफर मिळाली तर त्यांचा आनंद द्विगुणित होतो. मात्र एखाद्या गोष्टीची जास्त लालचं असणे चुकीचे ठरू शकतं. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. पाच हजाराची साडी ५९९ रुपयाला मिळते आहे, याची सोशल मीडियावर रील बघताच महिलांनी संबंधित दुकानात तुफान गर्दी केली. या गर्दीत ३ महिला बेशुद्ध पडल्या असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, मकर संक्रांत काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने छत्रपती संभाजीनगर शहरातील त्रिमूर्ती रोडवरील एका मोठ्या दुकानात साड्यांवर ऑफर ठेवण्यात आली होती. ही ऑफर रीलच्या माध्यमातून घराघरांत पोचवण्यात आली. गेल्या ३ महिन्यांपासून स्थानिक रीलस्टार्समार्फत १९९ ते ५९९ रुपयांमधील साड्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते.
रविवारी या दुकानाचे उदघाटन होते.सकाळी १० वाजल्यापासूनच महिलांच्या रांगा लागल्या होत्या. त्या दिवशी सकाळी ११ वाजता उद्घाटन होऊन दुकान उघडताच महिलांनी आत शिरण्यासाठी एकच गर्दी केली. ५ हजारांची साडी फक्त ५९९ रुपयांना मिळते म्हणून रील बघून महिलांनी दुकानात एकच गर्दी केली. या गर्दीत चेंगगराचेंगरी झाली.
काही वेळातच रस्ता पूर्णपणे जाम झाला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.दुकानात महिलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी तातडीने पथकासह धाव घेतली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी माईकचा वापर केला. 'ही ऑफर केवळ आजपुरती नसून ३६५ दिवस राहणार आहे,' असे जाहीर केल्यानंतर आणि बळाचा वापर करण्याचा इशारा दिल्यानंतर दुपारी २ वाजता ही गर्दी निवळली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.