Sambhajinagar News Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : पैठण तालुक्यात आढळले दोन सख्ख्या बहि‍णींचे मृतदेह; अपघात की घातपात? पोलीस तपास सुरू

Two Girl Body Found in Mahroba Village : पैठण तालुक्यात दोन सख्ख्या बहि‍णींचे मृतदेह आढळले. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

Rohini Gudaghe

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या 2 सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या डबक्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात घडली. प्राची पेद्रस चव्हाण आणि मलिका पेद्रस चव्हाण, अशी या दोन बहिणींची नावे आहेत. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने अख्खा पैठण तालुका हादला आहे.

याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली सख्ख्या बहीणी असून रविवारी सकाळी त्या पैठण तालुक्यातल्या म्हरोळा शिवारात बकऱ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी 3 वाजेच्या सुमारास गावातील एका तरुणाला या बकऱ्या मोकळ्या जागी चरताना दिसल्या.

बकऱ्याजवळ कुणीही नसल्याचे पाहून या तरुणाने सर्व बकऱ्यांना मुलींच्या घरी आणून सोडले. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी त्याचाकडे यासंदर्भात विचारणा केली. तेव्हा बकऱ्या मोकाट चरत होत्या म्हणून मी घरी आणल्या, असं या तरुणाने त्यांना सांगितलं.

मुलींची चिंता वाटू लागल्याने आई-वडिलांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी शिवारातील एका पाण्याच्या डबक्यात दोन्ही मुली बुडालेल्या आढळून आल्या. आरडाओरड झाली असता, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी दोन्ही मुलींना पाण्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

मात्र, डॉक्टरांनी दोघींनाही तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला असून हा अपघात आहे की? घातपात याचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : हायप्रोफाइल सोसायटीत 'काळेकांड'; सेक्रेटरीनं मर्यादा ओलांडल्या, महिलेला तसले मेसेज पाठवायचा, एकदा नव्हे तर दोनदा...

RO-KO : रोहित शर्मा, विराट कोहलीबाबत मोठी भविष्यवाणी! वर्ल्डकप खेळणार की रिटायरमेंट घेणार?

वर्गात फटकारलं, विद्यार्थ्यांची सटकली; शिक्षकाच्या गर्भवती पत्नी अन् २ मुलींना संपवलं, दिवसा रक्तरंजित थरार

Smriti Mandhana: वर्ल्डकपमध्ये स्मृती मानधनाने मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड, इतिहास रचला

Pakistan Protest : नेपाळनंतर पाकिस्तान पेटलं! सुरक्षादलाच्या जवानांचा TLP कार्यकर्त्यांवर गोळीबार; 280 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा

SCROLL FOR NEXT