2 Brother Died After Falling Into Well Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: आईची नजर चुकवून विहिरीकडे गेले अन् अनर्थ घडला, सख्ख्या भावांचा मृत्यू

2 Brother Died After Falling Into Well: आईसोबत शेतामध्ये गेले असता विहिरीमध्ये पडून दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू झाला. संभाजीनगरच्या पैठणमध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Priya More

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन सख्ख्या भावांचा विहिरीमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पैठण तालुक्यातल्या राजापूर शिवारात ही घटना घडली. आईसोबत शेतामध्ये गेले असता हा प्रकार घडला. विहिरीमध्ये जास्तप्रमाणात गाळ असल्यामुळे त्यामध्ये अडकून या दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे राजापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पैठणच्या आडूळ बुद्रुक येथील कृष्णा विठ्ठल फणसे यांची राजापूर शिवारात शेती आहे. या शेतावर कृष्णा यांच्या पत्नी वर्षा मंगळवारी सकाळी आपली दोन मुलं प्रणव (६ वर्षे) आणि जय (९ वर्षे) यांना घेऊन गेल्या होत्या. वर्षा फणसे या शेतातील सोंगलेल्या तुरीचे पेटे जमा करत होत्या. तर त्यांची दोन्ही मुलं बाजुला खेळत होते. अशातच ही दोन्ही मुलं आईची नजर चुकवून विहिरीच्या दिशेने गेले.

विहिरीजवळ दोघेजण खेळत होते. त्याचवेळी कठडे नसलेल्या या विहिरीमध्ये तोल जाऊन जय आणि प्रणव पडले. विहिरीमध्ये पाणी आणि गाळ देखील जास्त होता. विहिरित काही तरी पडल्याचा आवाज आल्यामुळे वर्षा यांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. पण तो पर्यंत उशिर झाला होता. त्यांनी आरडा ओरडा करून आजूबाजूच्या शेतातील नारिकांना बोलावले. या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली पण तोपर्यंत खूपच उशिर झाला होता. विहिरीमध्ये बुडून दोघांचाही मृत्यू झाला.

पाचोड पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रणव मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला. तर मोठा मुलगा जयचा मृतदेह लवकर सापडत नसल्याने शेवटी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना पचारण करावे लागले.

यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत विहिरीतील गाळाखाली अडकलेल्या जयचा मृतदेह बाहेर काढला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाठवण्यात आला. त्यानंतर त्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद पाचोडा पोलिस ठाण्यात करण्यात आली. जय आणि प्रणवच्या मृत्यूमुळे फणसे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT