Solapur Tuljapur Road Latest News Update Saamtv
महाराष्ट्र

Road Closed News: महत्वाची बातमी! तुळजापूर-सोलापूर महामार्ग २ दिवस बंद, पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर

Solapur Tuljapur Road Latest News Update: सोलापूर- तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी उद्या पासून 18 तारखेपर्यंत दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय धाराशिव पोलिसांनी घेतला आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १७ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे.

Gangappa Pujari

बालाजी सुरवसे, धाराशिव

Solapur Tuljapur Road Closed: तुळजाभवानी मंदिरात कोजागिरी पौर्णिमा यात्रेनिमित्त छत्रपती संभाजीनगर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग सोलापूर तुळजापूर मार्ग वाहतुकीसाठी दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. पायी चालत येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने रस्ते बंद करण्याचा मोठ निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोलापूरकडून जाणारी वाहतूक बार्शी मार्गे तर छत्रपती संभाजी नगर कडून येणारी वाहतूक बीड मार्गे लातूरला वळवण्यात आली आहे.

कोजागिरी पोर्णिमा आणि मंदीर पोर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करत असतात. आई तुळजा भवानीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक सोलापूरहून तुळजापूरकडे पायी चालत येतात. या पायी चालत येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या काळात छत्रपती संभाजीनगर हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग तर सोलापूर- तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी उद्या पासून 18 तारखेपर्यंत दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय धाराशिव पोलिसांनी घेतला आहे.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीला पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या ही कर्नाटक,आंध्र प्रदेश या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात असते. या पायी चालत येणाऱ्या भाविकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती धाराशिव चे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १७ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे.

दरम्यान, या काळात सोलापूर कडून येणारी वाहतूक बार्शी मार्गे बीडकडे तर छत्रपती संभाजी नगर कडून येणारी वाहतूक बीड मार्गे लातूरकडे वळवण्यात आली असून त्या ठिकाणी सूचनाचे फलक लावण्यात आले आहेत. भाविकांनी देखील रस्त्याने चालताना खबरदारी घ्यावं असं आव्हान धाराशिव पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT