Maratha Aandolak Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: सहानुभूतीसाठी कटकारस्थान... प्रकाश शेंडगेंच्या आरोपांवर मनोज जरांगेंचा पलटवार

Manoj Jarange Patil Press Conference: आम्ही तयारी सुरू केली असून विधानसभेला मराठा मैदानात असेल, असे जरांगे पाटील म्हणालेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

Gangappa Pujari

रामू ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. २८ एप्रिल २०२४

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेतून माघार घेतली असली तरी विधानसभेला उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. आम्ही तयारी सुरू केली असून विधानसभेला मराठा मैदानात असेल, असे जरांगे पाटील म्हणालेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

"या निवडणुकीत मी नाही. मराठा समाजाने आता ठरवायचे. समाजाचा आता नाईलाज आहे.आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही, जो सगे सोयरे या विषयाच्या बाजूने आहे त्याचा विचार करा. विरोध करणाऱ्यांना असे पाडा की त्यांच्या दोन तीन पिढ्या वर येऊ नये. मी कुणाला कॉल केला नाही की कुणाला मतदान करायचे हे सांगितले नाही," असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर शाईफेक झाल्याच्या घटनेवरही महत्वाचे विधान केले. "काही जण असे आहेत की ते स्वतः करतात आणि मराठ्यांवर नाव घालत आहेत. सहानुभूती मिळवण्यासाठी असे कटकारस्थान करत आहेत. मराठ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे," असे गंभीर आरोप त्यांनी केले.

भुजबळांवर टीका..

"आपण कधीच कुणाला विरोधक मानले नाही. येवला वाला सोडता मी कुणाला विरोधक मानले नाही. आपले कोणी विरोधक नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. तसेच पंतप्रधान मोदींनाही मराठा समाजाची भिती आहे, त्यामुळे प्रत्येक टप्प्यात त्यांना सभा घ्याव्या लागतात, इथेच मराठ्यांचा विजय.." असेही जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोपरी पाचपाखाडीत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकत्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT