Honey Trap SaamTv
महाराष्ट्र

Sambhajinagar : हनीट्रॅपवाली 'पुष्पा' स्वतःच ट्रॅपमध्ये, व्यापाऱ्यासोबत मैत्री वाढवून व्हॉट्सअॅपवर अश्लील संवाद अन्...

Honey Trap Case : एका व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या टोळीला अटक केली आहे.

Saam Tv

माधव सावरगावे, साम टीव्ही

छत्रपती संभाजीनगर शहरातील एका व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून १५ लाख रुपये लुटणाऱ्या एका महिलेसह चौघांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सिटी चौक पोलिसांनी मंगळवारी (दि. २८) रात्री रंगारगल्लीत ट्रॅप लावून २४ वर्षांच्या महिलेला २० हजार रुपये रोख घेताना ताब्यात घेतले आहे. पुष्पा साळवे (२४ वर्ष), अर्जुन लोखंडे (३०), हनी भूषण चव्हाण (१८), क्रिस्टल नीलेश रानडे (२०), आदित्य शेरे (सर्व, रा. भावसिंगपुरा) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी एक बंदूक देखील जप्त केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, पुष्पा साळवे या महिलेने छत्रपती संभाजीनगर शहरातील एका नामांकित सराफा व्यापाऱ्याशी प्रथम मैत्री केली. त्यानंतर या दोघांमध्ये व्हॉटॲपवर बोलणे सुरू झाले. काही व्हिडिओची देखील देवाण-घेवाण झाली. यातून झालेल्या अश्लील संवादातून मागील आठ महिन्यांपासून या टोळीने व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. व्यापारी प्रतिमेला जपण्यासाठी आठ महिन्यांपासून या टोळीला पैसे देत होता. मात्र लाख रुपये दिले की काही दिवसांतच ही टोळी पुन्हा पैसे मागत असे.

ब्लॅकमेलिंगचा प्रकार वाढल्याने शेवटी व्यापऱ्याने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर एसीपी संपत शिंदे, पीआय परदेशी यांच्या पथकाने मंगळवारी रात्री या टोळीला सापळा लाऊन शहराच्या रंगारगल्ली परिसरातून अटक केली. यावेळी पुष्पा साळवे, आदित्य शेरे, अर्जुन लोखंडे, हनी भूषण चव्हाण, क्रिस्टल नीलेश रानडे यांच्या ताब्यातून एक बंदूक आणि २० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, आतापर्यंत या टोळीने व्यापाऱ्याकडून सुमारे १० ते १५ लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. तसंच या टोळीने अजून काही व्यापाऱ्यांनाही फसवलं असल्याचं प्राथमिक तपासातून पुढे आलं आहे. तर या प्रकरणातील आरोपी महिलेचा पती देखील सराईत गुन्हेगार असून तो सध्या एमपीडीएमध्ये कारागृहात आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT