CHHATRAPATI SAMBHAJINAGAR ACB TRAP: API AND CONSTABLE CAUGHT ACCEPTING BRIBE FROM COLLEGE STUDENT Saam Tv
महाराष्ट्र

Bribe Case : पोलीस दलात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना ACB ने रंगेहाथ पकडलं

Sambhajinagar Bribe Case : छत्रपती संभाजीनगरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना कारवाई करण्यात आली.

Alisha Khedekar

  • संभाजीनगर पोलीस दलात खळबळ

  • पोलीस ठाण्यातील API आणि पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात

  • गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच घेतली

  • पहिला हप्ता स्वीकारताना दोन्ही आरोपी रंगेहाथ पकडले गेले

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. एका २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडून गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आणि एका पोलीस अंमलदारावर कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी हा महाविद्यालयात शिक्षण घेत असून त्याचे एका मुलीशी संबंधित वादाच्या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी तसेच विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नागूसिंग बहुरे (वय ४३) आणि पोलीस अंमलदार गोकुळ अनिलराव खटावकर (वय ४३) यांनी विद्यार्थ्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

लाचेची मागणी झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेच्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना दोन्ही आरोपींना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर आरोपी पोलीस अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे पोलीस विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दरम्यान, सरकारी पदाचा गैरवापर करून नागरिकांकडून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच कोणत्याही शासकीय कामासाठी अथवा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये मदत करण्याच्या नावाखाली कोणी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तत्काळ एसीबीकडे तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Ireland 1st T20I: भारताचा आयर्लंडकडून पहिल्यांदाच पराभव, 'या' ५ कारणामुळे सामन्यासह टीम इंडियानं गमवाली टी-२० मालिका

महसुलात 20 हजार कोटींचा घोटाळा? मुद्रांक शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT