Sambhajinagar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar Crime: जमिनीचा वाद टोकाला गेला अन् घडलं भयंकर; लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या

धाकट्या भावाच्या तक्रारी वरून मध्यला भावासह चौघांविरुध्द अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

नवनीत तापडिया, प्रतिनिधी...

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून धाकट्या भावाच्या तक्रारी वरून मध्यला भावासह चौघांविरुध्द अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News In Marathi)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, सिल्लोड (Sillod) तालुक्यातील लिहाखेडी येथे जमिनीच्या वादातून मोठा भाऊ बाबुराव गहेनाजी साखळे याचा मध्यला भावाशी तीन दिवसांपूर्वी वाद झाला होता. बुधवारी दोघा भावांचे शेतीच्या प्रकरणावरून वाद झाले. या वादात भगवान याने मयत बाबुराव याचे गुप्तांग दाबून उचलून आपटले.

यावेळी आरोपीचे मुले विशाल, आकाश आणि पत्नी सुभाद्राबाईने पोटात आणि अंगावर लाथा बुक्याने मारहाण केली. या मारहाणीत बाबुराव गहेनाजी साखळे गंभीर जखमी झाले. यानंतर बेशुध्द अवस्थेत बाबुराव यास त्याच्या धाकटा भाऊ राजाराम साखळे याने उपचारासाठी संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात, मयताच्या लहान भावाने दिलेल्या फिर्यादी वरून मधला भाऊ, त्याची पत्नी आणि दोन मुलावर अजिंठा पोलीस ठाण्यात खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

SCROLL FOR NEXT