Jain Monk killing News: धक्कादायक! जैन मुनींची निर्घृण हत्या; कूपनलिकेत सापडले मृतदेहाचे तुकडे, प्रकरण काय?

मुनींची निर्घृण हत्या करत त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते कूपनलिकेत टाकण्यात आलेत.
Jain Monk killing News
Jain Monk killing NewsSaam Tv
Published On

Karnataka Crime News: कर्नाटकमधून (Karnataka) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जैन मुनींची हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. मुनींची निर्घृण हत्या करत त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते कूपनलिकेत टाकण्यात आलेत. या धक्कादायक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज असे हत्या झालेल्या जैन मुनींचे नाव आहे. हिरेकुडी येथे नंदीपर्वत आश्रम आहे. या आश्रमाचे मुनी आचार्य श्री १०८ कमकुमार नंदी महाराज आहेत. ६ जून रोजी सकाळी आठ वाजता ते शेवटचे दिसले होते. त्यानंतर मठाजवळ असलेल्या भाविकांनी त्यांना पाहिले नाही.

Jain Monk killing News
Pune Crime News: पुण्यातील संतापजनक प्रकार! कामगाराकडून आश्रमातील ३ गतीमंद तरुणींवर लैंगिक अत्याचार

एक दिवस वाट पाहिली सर्वत्र शोधाशोध झाली. मात्र मुनींचा शोध लागला नाही. त्यामुळे आश्रमाच्या ट्रस्टींनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी वेगात तपासाला सुरुवात केली. शनिवारी खोदकाम करत कूपनलिकेतून मुनींच्या मृतदेहाचे तुकडे बाहेर काढण्यात आले.

सदर मुनी गेल्या १५ वर्षांपासून नंदीपर्वत आश्रमात राहत होते. पोलिसांनी या प्रकरणी तपासावेळी मठात कधी कोणती व्यक्ती आली होती याची माहिती घेतली. त्यानुसार तपासात दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. संशयित आरोपींच्या चौकशीत त्यांनी आपण पैशांच्या वादातून मुनींची हत्या केल्याची तोंडी कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

Jain Monk killing News
Pune Crime News : रोझरी स्कूलनजीक टाेळक्याचे पाेलिसांवर गाेळीबार, एक जखमी; झटापटीनंतर 5 अटकेत (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com