CHHATRAPATI SAMBHAJINAGAR DUBAI JOB SCAM: TEACHER BOOKED FOR FRAUD, ALLEGED CONVERSION AND FINANCIAL CHEATING Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : संभाजीनगर हादरलं! नोकरीचं आमिष देत शिक्षिकेचं धर्मांतर, हॉटेलमध्ये नेत केले अत्याचार

Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरात दुबईत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत शिक्षिकेची फसवणूक, धर्मांतरास भाग पाडणे आणि पैसे व दागिने उकळल्याचा आरोप. आरोपीविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Alisha Khedekar

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना

  • खासगी शिक्षकाविरोधात फसवणूक आणि धर्मांतराच्या दबावाचा आरोप

  • दुबईत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत शिक्षिकेला जाळ्यात ओढलं

  • पैसे आणि दागिने घेतल्यानंतर आरोपीने संपर्क तोडला

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

नाशिकमधील ‘कॉर्पोरेट धर्मांतर’ प्रकरण ताजे असतानाच छत्रपती संभाजीनगरातूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुबईमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका खासगी शिक्षकाने ४३ वर्षीय विवाहित शिक्षिकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे धर्मांतर करून महिलेवर अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर आरोपी महिलेचे पैसे, दागिने घेऊन पळाला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. त्याच शाळेत आरोपी हुसेन अबु सोयदान (वय ४५) शिक्षक म्हणून काम करत होता. एकाच ठिकाणी नोकरी करत असल्यामुळे दोघांमध्ये ओळख झाली आणि त्यातून मैत्री वाढली. या ओळखीचा फायदा घेत आरोपीने पीडितेला परदेशात नोकरीची संधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने पीडितेला तिच्या पतीपासून दूर जाण्यास प्रवृत्त केले. तसेच तिच्याशी लग्न करून एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त करत तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर शहरातील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुबईत नोकरी मिळवण्यासाठी धर्मांतर आवश्यक असल्याचे सांगून आरोपीने तिच्यावर दबाव टाकला. तिचे मनपरिवर्तन करून तिला धार्मिक विधी आणि कलमा पठण करण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीने कारणे सांगून पीडितेकडून मोठी रक्कम उकळली. ऑनलाइन व्यवहारांसह रोख रक्कम आणि सुमारे सहा तोळे सोने घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दुबईतील नोकरी, पासपोर्ट प्रक्रिया आणि इतर खर्चाचे कारण देत ही रक्कम उकळण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, पैसे आणि दागिने मिळाल्यानंतर आरोपीने संपर्क तोडल्याचा आरोप आहे. १ जूनपासून त्याचा मोबाईल फोनही बंद असल्याचे तक्रारदार महिलेने सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महसुलात 20 हजार कोटींचा घोटाळा? मुद्रांक शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

Congress Reshuffle : काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ; ३ राज्यांच्या संघटनेत अचानक केले बदल, संजय दत्त यांच्याकडे मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT