Chhatrapati Sambhajinagar Saam Tv
महाराष्ट्र

Crime : वाद झाला अन् बॉयफ्रेंडची सटकली, गर्लफ्रेंडला घाटावरुन ढकललं; संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar : प्रेम प्रकरणातून झालेल्या वादात एका तरुणीला तिच्या प्रियकराने दौलताबाद घाटातून धक्का देऊन खाली पाडले. प्रियकराने पोलिसांकडे गुन्हाची कबुली दिली.

Yash Shirke

डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीने त्याच्या प्रेयसीला घाटातून धक्का देऊन खाली पाडले. घाटातून खाली पडल्याने तरुणीचा मृत्यू झाला. घटनेनंतर तरुणाने पोलीस ठाण्यात हजर होत स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबाद घाटात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. ही तरुणी दौलताबाद घाटावरुन खाली पडल्याचे म्हटले जात आहे. तरुणीच्या प्रियकराने तिला धक्का दिला, घाटात खाली पडून तरुणीचा जीव गेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

प्रेम-प्रकरणामधून झालेल्या वादातून तरुणीला तिच्या प्रियकराने दौलताबाद घाटातून धक्का दिला. घाटातून खाली पडल्याने तरुणीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर तरुणीच्या प्रियकराने स्वत: शिऊर पोलीस ठाण्यात हजर होत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. घाटात पडलेल्या तरुणीचा मृतदेह पोलिसांनी काढला आहे. या घटनेत दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजीनगरमध्ये कोचिंग क्लासमधील वाद घरापर्यंत पोहोचला

कोचिंग क्लासमध्ये दोन मुलींमध्ये वाद झाला. या भांडणावरुन एका मुलीच्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या घरात घुसून तिच्या पालकांना अमानुष मारहाण केली. आरोपींनी दुसऱ्या मुलीच्या आईला पायावर नाक घासायला लावून माफी मागायला लावली. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहराच्या सातारा परिसरातील सर्वेश्वरनगर येथे घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शहापूर बसचा भीषण अपघात, 8 ते 10 प्रवासी जखमी

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

SCROLL FOR NEXT