Chhatrapati Sambhajinagar Accident News:  Saamtv
महाराष्ट्र

Accident News: चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात! सुसाट कार ४-५ वेळा उलटली; ४ जण गंभीर जखमी

Chhatrapati Sambhajinagar Accident News: सोलापूर धुळे महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून ही भीषण अपघाताची घटना घडली.

Gangappa Pujari

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. १६ जून २०२४

सोलापूर- धुळे महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून ही भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचपीर वाडी फाटा शिवारात सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 4 जण गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आहे आहे.

चालकाचे नियंत्रण सुटलं आणि ही कार भरधाव वेगात असल्यान नियंत्रणात आली नाही आणि त्यामुळे भरधाव कार चार- पाच वेळा उलटली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. अपघातातील सर्वजण हे गुजरात राज्यातील रहिवासी आहेत. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, भंडाऱ्याच्या तुमसर बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन पुलात शिरल्याची घटना घडली. सुदैवाने प्रसंगावधान राखून ट्रक चालकाने उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला. या अपघातामुळे या मार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप सरकारमध्ये मोठा फेरबदल होणार; कोणाकोणाला मिळणार डच्चू?

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! CNG आणि PNG च्या दरांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या ताजे दर

Bus Accident : पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भयंकर अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT