Maharashtra Politics: 'विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, छगन भुजबळांच्या नाराजीची खबरदारी घ्या...' शिंदे गटाच्या नेत्याचा राष्ट्रवादीला सल्ला

Maharashtra Politics Latest News: विरोधी पक्षाला महायुतीमध्ये संभ्रम कसा होईल? एकमेकांकडे संशयाने कसे बघू? हेच विरोधकांना हवे, असे म्हणत शंभूराज देसाई छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या.
Maharashtra Politics: 'छगन भुजबळांच्या नाराजीची खबरदारी घ्या...' शिंदे गटाच्या नेत्याचा राष्ट्रवादीला सल्ला
Ajit Pawar on Chhagan BhujbalSaam tv
Published On

वैदेही कानेकर, मुंबई|ता. १५ जून २०२४

लोकसभा निवडणुकांतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आधी लोकसभेच्या उमेदवारीवेळी त्यानंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या उमेदवारीवरुन भुजबळ नाराज असल्याचे बोलले जात होते. यावरुनच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी महत्वाचे विधान केले आहे.

काय म्हणाले शंभूराज देसाई?

"छगन भुजबळ नाराज असतील तर तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. जर नाशिकच्या जागेवरून नाराजी असेल तर ती जागा आधीच शिवसेनेची होती. त्यामुळे ती आमची होती. सुरुवातीला ज्याचा खासदार सीटिंग त्याची ती जागा असे ठरले होते. पण भुजबळ यांची नाराजीबाबत त्यांच्या पक्षनेतृत्वाने त्याची खबरदारी घ्यायला हवी," असे शंभूराज देसाई म्हणाले.

तसेच "पक्षाच्या प्रमुख नेते समितीने यावर बोलावे. जर हा विषय महायुतीच्या समन्वय समितीकडे आला तर आम्ही बोलूच. विरोधी पक्षाला महायुतीमध्ये संभ्रम कसा होईल? एकमेकांकडे संशयाने कसे बघू? हेच विरोधकांना हवे. मात्र भुजबळ यांच्या चेहऱ्यावरून, बोलण्यातून, बॉडी लँग्वेज मधून ते नाराज आहेत, असे वाटत नाही.." असा दावाही त्यांनी केला.

Maharashtra Politics: 'छगन भुजबळांच्या नाराजीची खबरदारी घ्या...' शिंदे गटाच्या नेत्याचा राष्ट्रवादीला सल्ला
Maharashtra Politics : लोकसभेत महायुतीला धोबीपछाड, आता विधानसभेसाठी काय रणनिती? आज 'मविआ'ची संयुक्त पत्रकार परिषद

"लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या काही गोष्टी आमच्या अनुभवाला आल्या. त्यामध्ये सुधारणा करून विधानसभेला 200 चे टार्गेट ठेवून आम्ही महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला पुढे जाणार आहोत, असे म्हणत आमचा विधानसभेचा मास्टर प्लान तयार असल्याचेही शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.

Maharashtra Politics: 'छगन भुजबळांच्या नाराजीची खबरदारी घ्या...' शिंदे गटाच्या नेत्याचा राष्ट्रवादीला सल्ला
MVA Press Confrence News | जिथं मोदींच्या सभा तिथंच आमचा विजय! शरद पवारांनी आकड्यांसहीत सगळं लॉजिक सांगितलं..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com