मराठा आरक्षणावरून खा. छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक; सरकारला लॉंग मार्चचा इशारा  Saam Tv
महाराष्ट्र

मराठा आरक्षणावरून खा. छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक; सरकारला लॉंग मार्चचा इशारा

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे हे महाराष्ट्रभर 'जन संवाद यात्रेच्या निमित्ताने दौऱ्यावर आहेत.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे हे महाराष्ट्रभर 'जन संवाद यात्रेच्या निमित्ताने दौऱ्यावर आहेत. या यात्रे दरम्यान काल ते सोलापुरात होते. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना सोलापुरतील छत्रपती शिवाजी प्रशालेमध्ये ते म्हणाले की, "सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे, मराठा तरुणांना विविध पदांसाठीच्या नोकऱ्यांच्या नियुक्त्या अद्याप देण्यात आले नाहीत.

मात्र,'अधिसंख्य जागा पॅटर्न' नुसार महाराष्ट्रात विविध पदांसाठी रखडलेल्या नोकऱ्यांच्या नियुक्त्या राज्य सरकार देऊ शकते, ज्याचा खर्च राज्य सरकारला उचलावा लागतो आणि सर्वोच्च न्यायालयाने ही सांगितले आहे की, याला आमचा कांही विरोध नाही. मात्र, ऍटोर्नी जनरल आशुतोष कुंभकोनी हा फक्त गोडगोड बोलतो, मागच्या २ महिन्यापासून पट्ट्या फिरकला सुद्धा नाही आणि फोन ही केला नाही.

हे देखील पहा-

त्यांचे मन बदललं की आणखी काय झालं आहे हे माहिती नाही, त्यांनी अजून आमचा हिसका पाहिलेला नाही" असे म्हणतं खासदार छत्रपती संभाजीराजेंनी थेट ऍटोर्नी जनरललाच धारेवर धरलं आहे. पुढे बोलताना खा. छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, "आम्ही हातात बांगड्या घालून बसायच का? मराठा समाजाची लोक एकत्र येत नाहीत हाच त्यांचा अजेंडा आहे. म्हणून संभाजीराजेंना मॅनेज केलं की विषय संपला, असा त्यांचा अंदाज आहे की नाही मला माहिती नाही.

मात्र, माझा जन्म छत्रपती घराण्यात झाला आहे. 'मॅनेज' हा शब्दचं माझ्या जवळपास येऊ शकतं नाही. मूक आंदोलन केलं, तरी तुम्हाला फरक पडत नाही. शांतपणाने चर्चा केली तरी तुम्हाला फरक पडत नाही. त्यामुळे आता 'जन संवाद यात्रेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे आणि राज्यातील गरीब मराठ्यांना केंद्राची आणि राज्याची जबाबदारी काय आहे, हे पटवून सांगणार आहे.

त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलावले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही आणि सकल मराठा समाज 'मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ही आता मुख्यमंत्र्यांना भेटणार नाहीत. कारण,मुख्यमंत्र्यांनी दिलेल पत्र हे सरकारी बाबूने लिहिलेलं पत्र आहे. उद्धवजींनी फक्त त्यावर सही केली आहे. त्यामुळे सरकारी बाबू हे मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत. असे म्हणतं त्यांनी मुख्यमंत्र्यांवर ही नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान ऍटोर्नी जनरल आशुतोष कुंभकोनी यांच्यावर बोलताना खासदार छत्रपती संभाजीराजे पत्रकार परिषदेत म्हणाले की "कुंभाकोनी हा एवढा मोठा नाही तुम्ही सोलापुरचा कुंभकोनी आहे, म्हणून त्याला मोठं करायला लागले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यंदाच्या हंगामात पांझरा नदी पहिल्यांदाच वाहू लागली दुथडी भरून

Shocking: 'ती'ओरडत राहिली पण..१० वर्षीय चिमुकलीचे नराधम पित्याने लचके तोडले, आईला कळताच..

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? आत्ताच हा यशाचा मंत्र लक्षात ठेवा

Thane : आई की, हैवान? ठाण्यातील महिलेचा लेकीला अमानुष मारहाण करतानाचा Video Viral

Tomato Shave Bhaji Recipe : एक टोमॅटो अन् वाटीभर शेव, रात्रीच्या जेवणाला झटपट बनवा 'हा' पदार्थ

SCROLL FOR NEXT