Son Killed Father  Saam tv
महाराष्ट्र

Son Killed Father : लग्न करु देत नाही, जमिनीची वाटणीही करत नाही; २ मुलांनी जन्मदात्या बापाची संपवलं

Son Killed Father after dispute : लग्न करू देत नाही आणि जमिनीची वाटणीही करत नाही, यावरून झालेल्या वादात मुलांनी वडिलांवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू झाला आहे.

माधव सावरगावे, औरंगाबाद

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव कोलाटीत येथून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. लग्न करू देत नाही आणि जमिनीची वाटणीही करत नाही, यावरून २ मुलांनी वडिलांवर हल्ला केला. या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळाळेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये पंधरादिवसांपूर्वी वडील आणि मुलांमध्ये वाद झाला. लग्न करू देत नाही आणि जमिनीची वाटणीही करत नाही, यावरून दोन मुलांनी रागाच्या भरात वडिलांवर चाकू हल्ला केला. प्रकाश आणि पोपत वाहुल अशी दोन्ही मुलांची नावे आहेत. या हल्ल्यात मुलांचे वडील गंभीर जखमी झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव कोलाटीत ही घटना घडली.

जखमी वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांचा आज उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन्ही मुलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संपत वाहुल हे त्यांच्या दोन्ही मुलांना लग्न करून देत नाहीत आणि जमिनीचीही वाटणी करून देत नाहीत, अशी तक्रार दोन्ही मुलांची होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईकरांना हक्काचं घर मिळणार, वरळीत म्हाडा बांधणार २ गगनचुंबी टॉवर्स; एक ८५ तर दुसरा ५८

Makyacha Chivda Recipe: मक्याचा कुरकुरीत चिवडा घरी कसा बनवायचा?

Dharmendra : धर्मेंद्र राजकारणात उतरले, खासदारही झाले, पण निवडणुकीत न उतरण्याची घेतली शपथ, नेमकं झालं काय होतं?

Maharashtra Live News Update : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, २२ जण जखमी

Dharmendra : पंजाब का मुंडा कसा बनला बॉलिवूडचा 'ही-मॅन'? धर्मेंद्र यांचा संघर्षमय प्रवास

SCROLL FOR NEXT