Crime News Saam TV
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : सकाळी कोरी पाने सोडा, सायंकाळी सविस्तर उत्तरे लिहा; अजब परीक्षेचा गजब कारभार

परीक्षा केंद्र चक्क शेजारचे ए. के. फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकानदारांकडून ऑपरेट केले जात असल्याचं समोर आलं आहे.

माधव सावरगावे, औरंगाबाद

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेतला एक धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आलाय. शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेंद्रा गावातल्या वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र चक्क शेजारचे ए. के. फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकानदारांकडून ऑपरेट केले जात असल्याचं समोर आलं आहे. (Education Crime)

या सेंटरवर सकाळी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सायंकाळी ४ ते ६ च्या वेळेत पुन्हा उत्तरपत्रिका लिहिण्यास दिल्या जातात. हे दुकानदार फक्त ३०० ते ५०० रुपये घेऊन संस्थाचालकाच्या मदतीने ही विशेष सोय उपलब्ध करून देतात. याबाबत चिकलठाणा पोलिसात तक्रार करण्यात आली. मात्र परीक्षा केंद्र प्रमुखाने आपले हात वर केलेत.

शेंद्र्याजवळच्या पीपल्स फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर सिक्युरिटी कॉलेजमधील विद्यार्थी वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात परीक्षा देत आहे. एका व्यापारी संकुलातील या परीक्षा केंद्रावर बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स) प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाचे १८० विद्यार्थी २३ मार्चपासून परीक्षा देत आहेत. इथं परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना खास सोय उपलब्ध करून देण्यात आलीय.

सकाळी १० ते ११.३० आणि दुपारच्या सत्रात दुपारी १ ते २.३० पर्यंत पेपर असतात. या परीक्षा केंद्रावर विद्यापीठाचे भरारी पथक फिरकतही नाही. त्यामुळे परीक्षेदरम्यान ‘मासकॉपी’ सर्रास सुरूच असते. पण तरीही प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे लिहिली नसतील तर त्यांना दोन्ही पेपर संपल्यानंतर दुपारी ४ नंतर वेगळा वेळ देऊन त्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी पुन्हा उत्तरपत्रिका दिल्या जातात. त्यासाठी सकाळी पेपर लिहिताना उत्तरपत्रिकेत कोरी जागा सोडण्याचे ‘मार्गदर्शन’ही या परीक्षार्थींना आधीच केलेले असते.

‘खास’ सोय केलेले विद्यार्थी सोमवारी दुपारी ४ वाजता परीक्षा हॉलमध्ये गेले. आपली उत्तरपत्रिका गठ्ठ्यातून शोधली. कॉपी करून पुन्हा पेपर लिहिला. त्यांना कुणीही रोखले नाही. अगदी छोट्या इमारतीतील दळवी कॉलेज शेजारी ए. के. झेरॉक्स सेंटर आहे. पीपल्स कॉलेजमधील रोहित नावाचा युवक येथे आला.

या दुकानदाराने त्याच्याशी ‘सौदा’ केला. सुरुवातीला ३०० रुपये मागितले. पण त्याने दहा विद्यार्थ्यांचे ‘सेटिंग’ करायचे सांगितल्यावर प्रत्येकाचे ५०० रुपये मागण्यात आले. या युवकाने ते मान्य केले. त्याच्यासोबतच्या एकाने रोख रक्कम जमा केली. (ऑनलाइन पेमेंट घेतले नाही). त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांचे मोबाइल क्रमांक, परीक्षा क्रमांकांची यादी कॉलेजला पाठवण्यात आली. त्यानंतर हे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर गेले व पुन्हा उत्तरपत्रिका लिहून आले. या गैरप्रकारामुळे विद्यापीठ प्रशासन परीक्षा हा विषय किती सहजपणे घेत आहे हे समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kumbha And Tula Rashi : करिअरपासून ते बिजनेसपर्यंत कसा जाणार कुंभ आणि तूळ राशीचा आजचा दिवस?

JioPC भारतात लाँच, आता कोणताही टीव्ही बनणार तुमचा कम्प्यूटर, कमी किमतीत भन्नाट सुविधा

Palghar Shocking : काकूनेच रचला पुतण्याच्या हत्येचा कट, १ लाखांची सुपारी दिली, एक चूक केली अन् भंडाफोड झाला

Maharashtra Live News Update: पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

Thane Crime: डिलिव्हरी बॉयला ड्रग्ज विकताना अटक, ४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT