>>नवनीत तापडिया, डॉ. माधव सावरगावे
Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या एका अनोख्या पार्टीची चर्चा आहे. ती पार्टी आहे नापास विद्यार्थ्यांची. महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी आयुक्तांकडून 6 जून रोजी फेल्युअर पार्टी ठेवली आहे. (Latest Marathi News)
वेगळे निर्णय घेऊन नेहमी चर्चेत राहणाऱ्या संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी ६ जून रोजी फेल्युअर पार्टी ठेवलीय. नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी खचू नये यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे.
दहावी आणि बारावीत नापास होणारे आणि कमी गुण मिळालेले विद्यार्थी नैराश्यात जातात. त्यामुळे त्यांचे पुढील उच्च शिक्षण धोक्यात येऊन त्यांच्या कौशल्यावरही परिणाम होतो. त्यामुळे त्यांना या काळात मार्गदर्शन आणि नवीन उभारी मिळावी, यासाठी पाठीवर थाप मारून चाल म्हणण्याची गरज असते.
माजी मंत्री दिवाकर रावते यांनी या विद्यार्थ्यांसाठी पहिला उपक्रम राबवला होता. त्यानंतर आता संभाजीनगर मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनीदेखील बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील १३,८३६ नापास झालेले किंवा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ६ जून रोजी सकाळी १० वाजता सिडको एन-५ येथील लाइट हाऊस, धर्मवीर संभाजी शाळेच्या शेजारी फेल्युअर पार्टीचे आयोजन केले आहे.
मनपा प्रशासकपदी रुजू झाल्यापासून जी. श्रीकांत यांनी इतरांपेक्षा काही वेगळे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बारावी परीक्षेमध्ये कमी गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेतील अपयशाचे दुःख नव्हे तर त्यापासून प्रेरणा घेऊन आनंद साजरा केला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.