Accident News saam tv
महाराष्ट्र

Biker Was Dragged up to 30 Feet: बसने दुचाकीस्वाराला ३० फुटांपर्यंत फरपटत नेलं; अपघातात तरुणाचा मृत्यू

Accident News: अपघात झाला तेव्हा बस इतकी भरधाव वेगात होती की, दुचाकी ३० फुटांपर्यंत फरपटत गेली.

Ruchika Jadhav

Chhatrapati Sambhaji Nagar News:

छत्रपती संभाजीनगर येथून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. या घटनेत एका बसची दुचाकीला जोरदार धडक झालीये. या धडकेत दुचाकी ३० फुटांपर्यंत फरपटत गेली. या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Accident News)

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सदर बस राज्य परिवहन महामंडळाची होती. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास वैजापूर तालुक्यातील खंडाळा बसस्थानकात हा अपघात झाला. अपघात झाला तेव्हा बस इतकी भरधाव वेगात होती की, दुचाकी ३० फुटांपर्यंत फरपटत गेली. यावेळी दुकीकीस्वार देखील फरपटत गेला अन् त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्तार रज्जाक शेख (वय ४४) असं घटनेतील मृत व्यक्तीचं नाव आहे. नाशिकहून ही बस छत्रपती संभाजीनगरकडे निघाली होती. यावेळी खंडाळा येथील सर्कलजवळ दुचाकीला बसची धडक बसली.

अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तरुणाला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. या घटनेमुळे बसमधील प्रवाशी फार संतप्त झाले. त्यांनी वाहन चालकाला रस्त्यातच चोप द्यायसा सुरुवात केली. सदर घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jahnavi Killekar: जान्हवी किल्लेकरचं 'बोल्ड' फोटोशूट

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाके यांच्या विरोधात बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Paithan Heavy Rain : मुसळधार पावसात संसार क्षणात उध्वस्त; ५४ मेंढ्या, ३ बैलांसह संपूर्ण संसार गेला वाहून, अतिवृष्टीने गोदावरीला अचानक पूर

Orange Barfi: फक्त 'हे' ३ पदार्थ वापरा अन् संत्रा बर्फी बनवा, वाचा सोपी रेसिपी

Weather Update : परतीच्या पावसाचा राज्यात धुमाकूळ, अहिल्यानगरमधील शाळांना २ दिवस सुट्टी

SCROLL FOR NEXT