Chhagan Bhujbal  Google
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : फडणवीस याआधीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते; भुजबळांना नेमकं काय म्हणायचंय?

Chhagan Bhujbal On Devendra Fadnavis: महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यावर चर्चा सुरु आहे. अशातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे होते, असं छगन भुजबळ म्हटले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra CM News : महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. भाजपचा मुख्यमंत्री होणार, हे आता जवळपास निश्चित झालेय. त्यात आता छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य करताना केलेल्या वक्तव्याने महायुतीमधील वातावरण तापण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस याआधीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलेय. त्यामुळे नव्या राजकीय चर्चेला उधाण सुरु झालेय.

काय म्हणाले छगन भुजबळ ?

ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा गोर गरिबांचं संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा ही अपेक्षा आहे. भाजपचाच मुख्यमंत्री होईल, देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही वर्षांमध्ये काम केलं. याआधी ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. पण पक्षाने त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून काम दिलं, त्यांनी काम केलं आणि झोकून काम केलं. मुख्यमंत्री होऊन देवेंद्र फडणवीस यांचा नैसर्गिक हक्क आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले.

अजित पवार मुख्यमंत्री झाले तरी चांगलं, पण यावेळी 132 आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांचाच होईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल, असेही भुजबळ म्हणाले.

मनोज जरांगेंवर टीकास्त्र -

ईव्हीएम मशीन ने जिंकलो असेल तर मला देखील एक लाख मतं मिळायला हवी होती. माझं मताधिक्य वाढायला हवं होतं ते कमी झालं. मनोज जरांगे पाटील साहेब आदल्या दिवशी सकाळी दहा पासून रात्री दोन पर्यंत गावोगावी फिरले आणि जातिवाद पसरवण्याचं काम केलं, म्हणून माझं मताधिक्य कमी झालं, असा आरोप भुजबळांनी जरांगे यांच्यावर केला.

मागील दीड वर्ष आपण अडचणीचे दिवस पाहतोय. बीडमध्ये लोकांची घरे जाळली गेली. मी 16 नोव्हेंबरला माझ्या मंत्री पदाचा राजीनामा देऊन, शड्डू ठोकला होता. राजीनामा दिलाय उल्लेख करू नका मला सांगितलं जात होतं. अडीच महिन्यानंतर उल्लेख करावा लागला, असेही भुजबळ यांनी सांगितले.

मराठ्यांच्या विरोधात नाही -

आम्ही मराठा सामाज्याच्या विरोधात नाही. 3 वेळा आरक्षण दिलं. 10 टक्के ews आरक्षण दिले. सात्यत्याने घरे जाळ... माझ्या निवडणुकीला पण ते आले. एका घरी सांत्वन करण्यासाठी ते रात्री 2 वाजेपर्यंत बसले, असे म्हणत भुजबळांनी जरांगेंवर हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : साखरपुडा मोडून मुलीनं बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं, वडील संतापले, नवविवाहीत माहेरी येताच नको ते करून बसले

New Marathi Serial: मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच; तीन महिन्यांत सुरु होणार आठ नव्या मालिका

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारची मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याचं निलंबन

IPL match fixing : गुजरात-राजस्थान सामन्यात झाली फिक्सिंग ? त्या एका व्हिडिओने उडाली खळबळ, पाहा

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यात अनेक भागात वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT