महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आले नाही. भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्याने राज्यभरात ओबीसी संघटना आणि ओबीसी समाजाने महायुती सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील ठीक-ठिकाणी आंदोलने केले जात आहेत. नांदेड, पुण्यात अजित पवार यांच्याविरोधात भुजबळ समर्थकांकडून आंदोलन केली जात आहेत.
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने नांदेडमध्ये देखील ओबीसी संघटना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झालेत. नांदेडच्या लोहा येथील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे दिले तर ओबीसी संघटना आणि ओबीसी समाज बांधवांनी महायुतीचा निषेध केला. पुण्यातही समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याविरोधात आक्रमकपणे आंदोलन केलं.
अजित पवार यांच्याविरोधात अजित पवार हाय हाय च्या घोषणा देण्यात आल्या. छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालेच, पाहिजे अशी मागणी त्यांनी केली यावेळी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केले. काळ्या फिती बांधून आणि काळी कपडे परिधान करून निषेध आंदोलन केलं जातं. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर देखील केलीय.
भुजबळ हे वेगळा निर्णय घेऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे, तसा संकेतही त्यांनी नाशिक येथे दिलाय. दरम्यान अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आहेत, ते नाराज असणं हे राष्ट्रवादी पक्षासाठी तोट्याचं ठरू शकतं. त्यामुळे अजित पवार त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे.
आपल्याला अजित पवार गटात मान मिळत नसल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केलाय. तर शरद पवार गटात असताना आपल्याला मान सन्मान मिळत असल्याचं ते म्हणालेत. मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे आग्रही होते. मात्र तरीही डावलण्यात आल्याचं भुजबळ म्हणाले. पक्षात फक्त सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, आणि अजित पवार यांच्यात चर्चा होते आणि निर्णय घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.