manoj jarange  Saam Tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: उठले की हॉस्पिटल, सुटले की पुन्हा हॉस्पिटल, पिऊन पिऊन किडनी खराब; मनोज जरांगेंवर कुणी केला गंभीर आरोप?

OBC Protest Heats Up: मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनादरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Omkar Sonawane

मुंबईतील आझाद मैदानावर ओबीसी समाजाच्या आंदोलनादरम्यान राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकार आणि पोलिसांना थेट इशारा दिला आहे. कायदा हातात घ्यायला अक्कल लागत नाही, पण जिथे अन्याय होतो, तिथे कारवाई झालीच पाहिजे. आम्ही संविधानाच्या मार्गाने जात आहोत. मात्र आमची डोकी फुटली, तर पुढील जबाबदारी शासन आणि पोलिसांची राहील, असे भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

शिवा संघटनेच्या वतीने आझाद मैदानात सुरू असलेले उपोषण हे 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काढलेल्या जीआरविरोधात आहे. या जीआरला रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. भुजबळ म्हणाले, एक चुकीचा जीआर काढला गेला, जो मला दाखवला सुद्धा गेला नाही. काही तथाकथित मराठा नेते असे समजतात की महाराष्ट्र आणि मराठा समाज त्यांच्या दावणीला बांधला आहे. ते नेहमी उपोषणाला बसतात उठले की हॉस्पिटल, सुटले की पुन्हा हॉस्पिटल. किडन्या खराब झाल्या पिऊन पिऊन जे काही बोलायचं ते बोलतात. असा जोरदार हल्लाबोल मनोज जरांगे यांच्यावर केला.

त्यांनी पुढे म्हटलं, त्या दिवशी पोलिसांना कोणी ऐकले नाही. रस्त्यावर नाचत होते, अंघोळ करत होते. ही मुंबई आहे! मी दोन वेळा या ठिकाणी महापौर झालो, आमदार झालो, पण अशी परिस्थिती कधी पाहिली नाही. मुंबईतून जो नारा उठतो तो देशभर ऐकला जातो.

तो जीआर टिकणार नाही, हा माझा ठाम विश्वास आहे. लाखे पाटील यांनी सांगितले की, आधी ठरवतात काय द्यायचं आणि मग उपोषणाला बसतात. एका तासात जीआर बदलतात, पात्र हा शब्द काढतात. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसोबत ही कुठली पद्धत? मी 1991 मध्ये महसूल मंत्री होतो, पण असे कधीच घडलं नाही.

भुजबळ पुढे म्हणाले, मला नेता बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. पहिले 10 शाखाप्रमुखांमध्ये मी होतो. मंडळ आयोगावरून आमचं मतभेद झालं, पण तो मराठा नेता अजून शिकलेला नाही. कोणालाही शिवी देतो, कोर्टाने काही फेटाळलेलं नाही, फक्त सर्व बाजू ऐकून घेत आहेत.

पुढे ते म्हणाले, आज शेतकऱ्यांना सरकारने मोठी मदत दिली, अशी मदत मी कधीच पाहिली नाही. आपण ओबीसी म्हणून एकत्र राहायला हवं. तो जीआर रद्द करणे हेच आपलं उद्दिष्ट आहे. असे छगन भुजबळ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे हादरले! पत्नीची निर्घृण हत्या करून पतीनेही संपवले आयुष्य; कारण वाचून पायाखालील जमीन सरकेल

Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; आता व्हीआयपी दर्शन बंद, काय आहे नेमका नियम?

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

SCROLL FOR NEXT