Supriya Sule Being Announced As NCP Working President SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics Breaking : ...म्हणून सुप्रिया सुळेंकडे शरद पवार यांनी सोपवली इतकी मोठी जबाबदारी!

Nandkumar Joshi

Supriya Sule Being Announced As NCP Working President : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी ही घडामोड आहे. सुप्रिया सुळेंकडे राज्याच्या निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी दिली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रासह पंजाब आणि हरयाणा या दोन राज्यांचीही जबाबदारी सोपवली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून सुप्रिया सुळेंकडे (Supriya Sule) इतकी मोठी जबाबदारी देण्यामागील नेमकी कारणे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सांगितली आहेत. (Breaking Marathi News)

छगन भुजबळ काय म्हणाले? वाचा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्रासह पंजाब आणि हरयाणाची जबाबदारी दिली आहे. याशिवाय राज्यातील निवडणुकांचीही जबाबदारी सोपवली आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यामागचं कारण सांगितलं आहे.

शरद पवार यांनी पूर्ण विचार करूनच या जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. या नेत्यांनी केवळ इथे महाराष्ट्रात किंवा लोकसभेत राहून काम करणे इतके पुरेसे नाही. काही राज्यांत पक्ष वाढवण्याचे काम तुम्ही करायला हवे, असे पवार यांचे म्हणणे आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

काही राज्यांची सुप्रिया सुळे आणि काही राज्यांची प्रफुल्ल पटेल यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. या दोन्ही नेत्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. कारण निवडणुका खूप जवळ आल्या आहेत. अशा परिस्थितीत पक्षाला अधिक बळकटी देण्याचे काम केले आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले.

अजित पवार यांची प्रतिक्रिया

खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के. के. शर्मा, पी. पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. शरद पवार यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. तसेच नवनिर्वाचित नेत्यांचे अभिनंदनही केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख, जाणून घ्या;सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT