भरत मोहळकर, साम प्रतिनिधी
मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यामुळे छगन भुजबळांनी ही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. मंत्रिपद न दिल्यानं भुजबळांनी उघ़डपणे नेतृत्वावर टीका करत नाराजी व्यक्त केलीय. महाराष्ट्रभर ओबीसी समाजाची मोट बांधत भुजबळांनी जरांगेंविरोधात रान पेटवलं होतं. एवढंच नव्हे तर राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली होती. मात्र तरीही त्यांना डावलण्यात आलंय. आणि त्यामुळेच की काय जरांगेंना भिडल्याचं बक्षीस मिळाल्याची उद्विग्न प्रतिक्रिया भुजबळांनी दिली,.
एवढ्यावरच भुजबळ थांबले नाहीत तर त्यांनी थेट अजितदादांना सोडण्याचे संकेतच दिले.शायराना अंदाजात भुजबळ नेमकं काय म्हटले ते पाहूयात.1991 मधील नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेतील पहिलं मोठं बंड करणाऱ्या छगन भुजबळांना शरद पवारांनी मंत्रिपद दिलं होतं... मात्र 33 वर्षानंतर त्याच नागपुरात शरद पवारांचा पुतण्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी छगन भुजबळांसारख्या वरिष्ठ नेत्याचा पत्ता कापला... त्यामुळे दुखावलेले छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडून तुतारी फुंकणार की राजकीय वर्तुळ पूर्ण करत मशाल हाती घेणार? याचीच चर्चा रंगलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.