shiv bhojan thali, Chhagan Bhujbal, Irshalwadi news today saam tv
महाराष्ट्र

Ration & Shiv Bhojan Thali Free : इर्शाळवाडीत शिव भाेजनसह अन्नधान्य माेफत द्या; छगन भुजबळांचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश (पाहा व्हिडीओ)

या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

Siddharth Latkar

Chhagan Bhujbal News : रायगडच्या इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनास्थळी (Irshalwadi landslide) मोफत शिवभोजन थाळीचे (shiv bhojan thali) पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केला आहे. त्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बाेलताना सविस्तर माहिती दिली. (Maharashtra News)

इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेच्या (landslides) पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील दालनात अन्न, नागरी पुरवठा विभागच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आणि तातडीने मदत पुरविण्याचे आदेश दिले. त्यानूसार कार्यवाहीस प्रारंभ झाल्याची माहिती मंत्रालयीन अधिका-यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

भूजबळ म्हणाले आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून हे पॅकेट देण्यात येणार आहे. शिवाय ५ लिटर रॉकेल, १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील देण्यात येणार आहे.

जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत हा पुरवठा सुरूच राहणार असल्याचे सांगतानाच छगन भुजबळ यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना तातडीने याबाबतचे आदेश दिले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT