Chhagan Bhujbal  SaamTv
महाराष्ट्र

Chhagan bhujbal : सर्वात मोठी राजकीय घडामोड; विधानसभा जागांवरून भाजप - राष्ट्रवादीत होणार राडा, छगन भुजबळांनी थेट आकडाच सांगितला!

Chhagan Bhujbal On Vidhansabha Seat Sharing : विधानसभेच्या जागांवरून महायुतीत जुंपण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच महायुतीत किती जागा मिळाल्या पाहिजे, याचा आकडा छगन भुजबळांनी सांगितला.

Vishal Gangurde

पुणे : आगामी विधानसभा निडवणूक जाहीर होण्याची आधीच राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीला काही महिने बाकी असतानाच जागावाटपावरून भाजप - राष्ट्रवादीत राडा होण्याची शक्यता दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीत किती जागा मिळाल्या पाहिजे, याचा आकडा छगन भुजबळांनी सांगितला. छगन भुजबळ यांनी ८० जागांचा आग्रह कायम ठेवला आहे.

छगन भुजबळ यांनी आगामी विधानसभा जागांवरून मोठा दावा केला आहे. छगन भुजबळ यांनी महायुतीमधील ८० जागांचा आग्रह कायम ठेवला आहे. छगन भुजबळ यांच्या दाव्याने महायुतीत जागावाटपांवरून जुंपण्याची शक्यता आहे.

महायुतीतील ८० जागांवर दावा करताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, 'आमच्याकडे जास्तीचे सदस्य आहेत. त्यामुळे १५ ते २० सदस्य मिळतीलच ना? यात चूक काय? माझा आग्रह कायम आहे'.

खासदारकीच्या इच्छेवर भाष्य करताना छगन भुजबळ म्हणाले, 'माझी खासदार होण्याची इच्छा आहे. नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार झालो होते. दिल्लीतूनही माझं तिकीट फायनल झालं होतं. त्यानंतर मी कामालाही लागलो होतो. मात्र, नंतर मी थांबलो. नाशिकमध्ये अर्ज दाखल करण्याच्या एका दिवसाआधीच तिकीट जाहीर करण्यात आलं. पक्ष म्हटल्यावर काही गोष्टी मनाप्रमाणे होत नाही. काही वेळा थांबावं लागतं'.

'महायुती मागे का पडली, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. 400 पारचा नारा दिल्याने संविधान बदलणार असा प्रचार करण्यात आला. यामुळे आदिवासी, दलित आणि मुस्लिम समाज दूर गेला,असेही भुजबळांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT