NCP  SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा भाकरी फिरणार; अजितदादांचं नाव चर्चेत असतानाच बड्या नेत्याचा प्रदेशाध्यक्षपदावर दावा?

Chandrakant Jagtap

Chhagan Bhujbal Claim For NCP State President Post: शरद पवार यांनी राष्ट्रवादीत भाकरी फिरवल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पदावर (NCP State President Post) देखील नेत्यांकडून दावा सांगितला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी मला विरोधी पक्षनेतेपद नको, मला पक्षात कोणतही पद द्या अशी इच्छा व्यक्त केली होती.

त्यानंतर अजित पवार यांनी प्रदेशाध्यपदावर दावा केल्याचे बोललं जात होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांचा दाखला देत राष्ट्रवादीने देखील ओबीसींना प्रदेशाध्यपद द्यावे असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

भुजबळ म्हणाले, पक्षाला ओबीसी नेता मिळाला तर पक्ष आणखी मजबूत होण्यास मदत होईल. यामुळे ओबीसी समाज मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडला जाऊ शकतो. राष्ट्रवादीत तटकरे, मुंडे, आव्हाड आहेत त्यांना प्रदेशाध्यक्ष केले जाऊ शकते किंवा मलाही जबाबदारी दिली तर मीही काम करेन असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे.

छगन भुजबळ म्हणाले, आमचा पक्ष लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे. त्यात प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करतो. मी देखील माझं मत व्यक्त करतो. विरोधी पक्षनेते पदावर एका समाजाची व्यक्ती असेल तर प्रदेशाध्यक्ष पदावर दुसऱ्या समाजाची व्यक्ती असावी. विरोधी पक्ष नेते अजित पवार असल्याने प्रदेशाध्यक्ष पदी ओबीसी समाजाचे नेत्याला संधी द्यावी असे भुजबळ म्हणाले.

ते म्हणाले, भाजपने ओबीसी असलेल्या बावनकुळेंना प्रदेशाध्यक्ष केलं, काँग्रेसनेही ओबीसी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिलाी. शिवसेनेत तशी पद्धत नाही, पण त्यांचा देखील दुसऱ्या क्रमांकाचे नेते संजय राऊत देखील ओबीसी आहेत. तसेच आमच्या पक्षात ओबीसी नेत्याला जबाबदारी दिली पाहिजे असे छगन भुजबळ म्हणाले. (Latest Political News)

आधी आजित पवार यांनी पक्षातील पदाबाबात व्यक्त केलेली इच्छा आणि आता छगन भुजबळ यांनीही प्रदेशाध्यक्ष होण्याबाबत केलेलं मोठं विधान यामुळे राष्ट्रवादी पक्षात प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. (Marathi Tajya Batmya)

जयंत पाटील हे मागील पाच वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. प्रत्येकी तीन वर्षांनंतर प्रदेशाध्यक्ष हे पद बदलण्याची तरतूद पक्षाच्या घटनेत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या आजच्या वक्तव्यानंतर शरद पवार काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे. अशातच छगन भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT