SSC Exam Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

SSC Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांचा अजब प्रताप; चक्क नारळ फोडून केली पेपरला सुरुवात, व्हिडिओ प्रचंड व्हायरल

दहावीच्या विद्यार्थ्यांचा अजब प्रताप; चक्क नारळ फोडून केली पेपरला सुरुवात, व्हिडिओ प्रचंड व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

छत्रपती संभाजीनगर : माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षण विभागामार्फत आजपासून दहावीच्‍या परीक्षेला (SSC Exam) सुरवात झाली. पेपराला जाण्यापुर्वी अनेक विद्यार्थी आई– वडील, देवाच्‍या पाया पडून आशिर्वाद घेत असतात. परंतु, औरंगाबादमध्‍ये (Aurangabad News) दहावीच्‍या काही विद्यार्थ्यांनी अजब प्रकार करत चक्‍क नारळ फोडून पेपराला सुरवात केली. याचा व्‍हीडीओ देखील प्रचंड व्‍हायरल झाला आहे. (Tajya Batmya)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. उच्‍च शिक्षणाची पहिली पायरी म्‍हणून दहावीच्‍या परीक्षेकडे पाहिले जाते. ही पायरी पार करण्यासाठी विद्यार्थी वर्षभर मेहनत करत असतात. परंतु, परीक्षा जवळ आली की मनात धाकधूक असते. ही धाकधूक कमी व्‍हावी याकरीता अनेक विद्यार्थी हे मंदिरात जावू देवाचे दर्शन करतात. शिवाय, आई– वडीलांचे देखील आशिर्वाद घेतात. परंतु, छत्रपती संभाजीनगर परिसरात परीक्षा केंद्राच्‍या बाहेर काही विद्याथ्‍र्यांनी अजबच प्रकार केला आहे.

‘भवानी की जय’चा जयघोष

छत्रपती संभाजीनगरच्या लासुर स्टेशन येथील विद्यार्थ्यांचा हा प्रताप आहे. पेपर सुरू होण्याच्‍या काही वेळापुर्वीच या विद्याथ्‍र्यांनी हा प्रकार केला आहे. आपले नोटपॅड बाजूला ठेवून त्याच्या शेजारी एक दगड ठेवून नारळ फोडले. यावेळी बोल भवानी की जय चा जयघोष करून नारळ फोडत पेपराला सुरवात केली. याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

Boondi Ladoo Recipe: या भाऊबीजनिमित्त भावाला द्या खास मिठाई; झटपट बनवा हॉटेल स्टाईल बूंदीचे लाडू

Shilpa Shetty Photos: लाल साडी अन् सडपातळ कंबर, शिल्पाच्या सौंदर्याने केले घायाळ

Rain : राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने झोडपलं; नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Heart Attack: सकाळची ही सवय वाढवते हार्ट अटॅकचा धोका; रक्तवाहिन्या का होतात ब्लॉक?

SCROLL FOR NEXT