कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आणलेले सात किलो मटण गेले चोरीला!  SaamTvnews
महाराष्ट्र

कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आणलेले सात किलो मटण गेले चोरीला!

शेवटी साधी भाजी कार्यकर्त्यांनी तोंड नासवत घश्यात उतरवली! विरोधकांनीच हा कपटीपणा केल्याचा उमेदवाराच्या पतीचा आरोप.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरीत नगर पंचायत निवडणुकीत मजेदार प्रकार पुढे आला आहे.  कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आणलेले सात किलो मटणच (Mutton) चोरीला गेले. उमेदवाराच्या पतीने प्रचारात रंगत आणण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी सात किलो मटण आणलं होतं. एका निर्जन ठिकाणी पार्टीचा (Party) बेत ठरला. सगळ्या साहित्यासह कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. (Chandrapur : Seven kg mutton brought for workers was stolen)

हे देखील पहा :

पण, त्याचवेळी कार्यकर्त्यांच्या घशाला कोरड पडली. आधी कोरड घालवायची आणि मग मटण बनवायची, असा प्लॅन करून सगळेच दारू (Liquor) रिचवायला गेले. दारूच्या ओलाव्याच्या खुशीत मटण आणि इतर साहित्य तिथेच पडून आहे, याचेही भान त्यांना राहिले नाही. जेव्हा हे आपला घसा ओला करून परतले, तेव्हा तिथले मटणच गायब होते. तेल-तिखट-मसाला हे सगळं साहित्य मात्र जैसे थे होते. या अजब प्रकाराने उमेदवार पतीच्या आणि कार्यकर्त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले.

शेवटी साधी भाजी कार्यकर्त्यांनी तोंड नासवत घश्यात उतरवली. हा गमतीदार प्रकार गोंडपिपरी शहरातील प्रभाग 15 मध्ये घडला. 18 जानेवारी रोजी इथे नगर पंचायत निवडणूक असून प्रचार शिगेला पोहचला आहे. मात्र, त्याचवेळी घडलेल्या या प्रकाराची खमंग चर्चा शहरात सुरू आहे. हे महापाप प्रभागातील विरोधकांचं असल्याची ओरड उमेदवाराचा पती करीत सुटला आहे. त्या पतीदेवाची फजिती झाली असली तरी समाजमाध्यमात (Social Media) या प्रकारावर चांगलीच खसखस पिकली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : पुन्हा अहमदाबादमध्येच फायनल, 2026 च्या वर्ल्डकपची ठिकाणं ठरली; भारत-पाकिस्तान सामना या शहरात

Maharashtra Live News Update: मला संपून टाकण्याची ऑन एअर धमकी दिली- धनंजय मुंडे

पुण्यातील गुन्हेगारांचा डेटा जमा करा, बेनामी मालमत्ता शोधा आणि ईडी लावा|VIDEO

Sweet Potato Chaat: समोसा चाट विसरा! हिवाळ्यात खास बनवून खा चटपटीत रताळ्याची चाट, वाचा परफेक्ट स्ट्रीट-स्टाईल रेसिपी

Dhananjay Munde: मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी, जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

SCROLL FOR NEXT