Tiger Death Saam tv
महाराष्ट्र

Tiger Death : महिनाभरात ११ पट्टेरी वाघांचा मृत्यू; विदर्भातील आकडेवारी चिंता वाढवणारी!

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात देखील दोनशेवर वाघ आहेत. वाघांची वाढती संख्या आनंददायी असली तरी, त्यांच्या झपाट्याने होणाऱ्या मृत्यूची संख्या देखील तेवढीच चिंतादायक ठरली आहे

संजय तुमराम

चंद्रपूर : मागील काही विसांपासून पट्टेरी वाघांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात विदर्भात  मागील महिनाभरात एकूण ११ वाघांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. एका महिन्यात एवढे मृत्यू होणे, ही बाब वाघांच्या दृष्टीने चिंताजनक मानली जात आहे.

मागील दहा वर्षात राज्यात वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली. चंद्रपूर जिल्ह्यात देखील दोनशेवर वाघ आहेत. वाघांची वाढती संख्या आनंददायी असली तरी, त्यांच्या झपाट्याने होणाऱ्या मृत्यूची संख्या देखील तेवढीच चिंतादायक ठरली आहे. मानव- वन्यजीव संघर्ष हा ज्वलंत विषय आहे. पण शिकार, रस्ते अपघात ही काळजीचा विषय झाला आहे. जंगलाशिवाय वाघ आता गावाशेजारी, शेतात, माळरानात दिसू लागले आहेत.

नैसर्गिक मृत्यूचे प्रमाण कमी 

संख्या वाढल्याने वाघांचे अधिवास क्षेत्र मर्यादित होऊ लागले. त्यामुळे जिथे आश्रय मिळेल, तिथे ते राहू लागले. त्यातूनच मानव- वाघ असा संघर्ष होऊ लागला. स्थलांतर करताना अपघातात वाघांचा मृत्यू होऊ लागला आहे. तर नैसर्गिक मृत्युपेक्षा इतर कारणांनी मृत्यू होण्याच्या घटना अधिक दिसून येत आहेत. त्यामुळे यावर उपाययोजना तातडीने करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

महिनाभरात वाघांचे झालेले मृत्यू
२ जानेवारी २०२५ रोजी ब्रम्हपूरी वन विभागात सिंदेवाहीजवळील लाडबोरी शिवारात नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळून आला. हा मृत्यू वृद्धापकाळाने झाला होता. तर ६ जानेवारी २०२५ रोजी भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात वाघाचे चार तुकडे आढळून आले होते. शिकाऱ्यांनी रानटी डुकरांची शिकार करण्याकरिता ११ हजार केव्हीच्या विद्युत तारांत तीन वर्षीय सुमारे दीडशे किलो वजनाची वाघीण अडकल्याने मृत्यू. ७ जानेवारीला यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन विभागाअंतर्गत उकणी कोळसा खाण परिसरात वाघाचा मृतदेह आढळून आला होता. या वाघाचे दोन मुख्य दात आणि १२ नख गायब होते

दोन मादी बछड्यांचा मृत्यू 

याशिवाय ८ जानेवारीला पेंच व्याघ्र प्रकल्पात देवलापार वनपरिक्षेत्रात मादी बछड्याचा मृतदेह आढळून आला होता. हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे स्पष्ट झाले होते. ९ जानेवारीला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल बफर झोनमध्ये मादी बछड्याचा मृतदेह आढळून आला होता. १४ जानेवारीला गोंदियातील दासगाव वनपरिक्षेत्रामध्ये नर वाघाचा मृतदेह आढळून आला. १७ जानेवारीला पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळला. 

१९ जानेवारीला बल्लारशाह- गोंदिया रेल्वेमार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला. २० जानेवारी रोजी ताडोबामध्ये वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळला. काही महिन्याआधी वाघांच्या लढाईमध्ये जखमी असल्याने हा मृत्यू झाला. तर २२ जानेवारीला पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचा मृतदेह आढळला, तर वर्ध्यात रस्ते अपघातात मादी छावा वाघाचा मृत्यू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकून, जालना हादरलं

Bihar Election Result: कधीपासून सुरू होणार EVM मतमोजणी; कशी असणार मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था?

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल अपघातात ८ जणांना मृत्यू

Todays Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ मिळेल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT