Chandrapur weather rain: The Meteorological Department had predicted the possibility of unseasonal rain Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Weather Today: चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह पाऊस

Weather Report For Chandrapur Today: गेले आठवडाभर वाढत्या तापमानाने चंद्रपूरकर त्रस्त होते. दरम्यान राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती

संजय तुमराम

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. जणू काही सूर्य आग ओकत आहे. या दरम्यान (Chandrapur) चंद्रपूरमध्ये आज दुपारच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाचे आगमन झाले. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याचे पाहण्यास मिळाले. अचानक आलेल्या पावसाने चंद्रपुरात चाकरमान्यांची धावपळ उडाली. 

गेले आठवडाभर वाढत्या तापमानाने चंद्रपूरकर त्रस्त होते. दरम्यान राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. या अंदाजानुसार आज दुपारी अचानक ढगांची दाटी होत विजांच्या कडकडाटासह चंद्रपुरात (Rain) पावसाला सुरुवात झाली. अचानक सर्वत्र अंधारल्याने महामार्गावरील वाहनांना देखील हेडलाईट लावून मार्गक्रमण करावे लागले. या पावसाने चंद्रपुरात वाढत्या तापमानापासून नागरिकांना मात्र जरा दिलासा मिळाला.

उकाडा वाढणार

चंद्रपुरात (Temperature) तापमान ४० अंशाच्या जवळ गेले आहे. अशात आज दुपारच्या सुमारास झालेल्या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या पावसानानंतर उकाड्यात प्रचंड वाढ होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. शिवाय अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

परवानगी १४ ची, बांधले २१ मजले! केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे; बिल्डर आणि अधिकाऱ्यांची अशी झाली पोलखोल

Fennel Seeds : कच्ची की भाजलेली बडीशेप? आरोग्यासाठी कोणती अधिक योग्य?

बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IAS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात पुन्हा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात...

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला; 45 लाखांची लाच घेताना बड्या सरकारी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडला

SCROLL FOR NEXT