चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात महामार्गावर दुचाकी वाहन चालकांना वाहतूक पोलिसांकडून पैसे मागितले जात आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला आहे. (Chandrapur Police News)
चंद्रपूर- नागपूर (Chandrapur News) महामार्गावर वेग नियंत्रण व सामान्य तपासणीसाठी महामार्ग पोलिसांचे (Police) पथक अत्याधुनिक साधनांसह सज्ज असते. मात्र हे पथक आपले मूळ काम सोडून केवळ पैसा वसुलीत गुंतले असल्याचा धक्कादायक व्हिडिओ पुढे आला आहे. हेल्मेटसक्ती असो वा कागदपत्र तपासणी यावर केवळ ‘नोटा’ हा एकच उपाय असल्याचे थेट व्हिडिओतून पुढे आले आहे.
कारवाई काय? यावर लक्ष
वाहनधारकांना सातत्याने नाडवणाऱ्या वसुलीबाज पोलीस कर्मचाऱ्यांना दुचाकी वाहन धारकांनी जणू व्हिडिओतून धडा शिकविला आहे. मार्गावर पुर्ण पथक तैनात आहे. त्यात हा एक पोलीस कॅमेरात अडकला. मात्र उर्वरित काय करतात, हे वेगळ्याने सांगण्याची गरज उरलेली नाही. अत्यंत सुस्त असलेले चंद्रपूरचे पोलीस प्रशासन या पथकावर नेमकी काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.