Chandrapur News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur News : धक्कादायक.. गावठाणजवळ बीअर बार, रेस्टॉरंटला परस्पर परवानगी; चंद्रपुरातील ३३ ग्रामसेवकांना नोटीस

Chandrapur News : ग्रामपंचायत कार्यालयमध्ये सक्षम प्राधिकारी नसताना चक्क ग्राम‌सेवकांने गावठाण बाहेरील जागेवर हॉटेल व रेस्टॉरंटच्या पक्क्या बांधकामाला पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आला

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यावर दारू दुकाने, बिअर बार व रेस्टॉरंटचे अमाप पीक आले आहे. दरम्यान ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव आल्यानंतर अधिकार नसताना ग्रामसेवकांनी गावठाणजवळील जागेवर बिअरबार व रेस्टोरंटला परस्पर परवानगी दिल्याचा प्रकार जिल्ह्यात समोर आला आहे. या प्रकरणानंतर ग्रामसेवकांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातील ३३ ग्रामसेवकांनी हा धक्कादायक कारनामा केला आहे. ग्रामपंचायत कार्यालयमध्ये सक्षम प्राधिकारी नसताना चक्क ग्राम‌सेवकांने गावठाण बाहेरील जागेवर हॉटेल व रेस्टॉरंटच्या पक्क्या बांधकामाला पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही माहिती पुढे आल्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. यामुळे एकूण ३३ ग्रामसेवकांना (Zilha Parishad) जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. 

बिअर बार परवानगीपूर्वी हॉटेल व रेस्टॉरंटच्या पक्के बांधकामाचा परवाना गावठाण हद्दीत असेल; तर ग्रामपंचायतला देण्याचा अधिकार आहे. हाच परवाना गावठाणबाहेर असेल तर याची परवानगी देण्याचा अधिकार महसूल विभागाकडे असतो. मात्र, गावठाण हद्दीच्या बाहेर असलेल्या बांधकामांना ३३ ग्रामसेवकांनी परवानगी दिली कशी, असा प्रश्न पुढे आला. त्यामुळे आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले गेले आहे. नोटिसचे उत्तर आल्यावर या ग्रामसेवकांवर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

Satbara Utara : कामाची बातमी! ५ मिनिटात घरबसल्या काढा सातबारा, फक्त ₹१५ होणार खर्च; पाहा 7/12 ऑनलाइन काढण्याची सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT