BJP MLA Bunty Bhangdia  Saamtv
महाराष्ट्र

Chandrapur: मोठी बातमी! भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

BJP MLA Bunty Bhangdia: भाजप आमदार बंटी भांगडिया आणि त्यांच्या 8 कार्यकर्त्यांवर मारहाण, शिवीगाळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल दाखल झाला आहे..

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

Chandrapur: जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजप आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील काँग्रेस जिल्हा सरचिटणीसाचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुर पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला असून यामुळे दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News Update)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघाचे भाजप (BJP) आमदार बंटी भांगडिया आणि त्यांच्या 8 कार्यकर्त्यांवर मारहाण, शिवीगाळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल दाखल झाला आहे. तर आमदार भांगडिया यांच्या तक्रारीवरून फिर्यादी साईनाथ बुटके यांच्यावरही शिवीगाळ आणि बदनामी केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

साईनाथ बुटके या काँग्रेस (Congress) समर्थकाने त्याच्या व्हाट्सएप स्टेटसवर आमदार बंटी भांगडीया यांची आणि त्यांच्या परिवाराची बदनामी करणारा मजकूर पोस्ट केला होता. त्यामुळे संतापलेल्या बंटी भांगडीया आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री साईनाथ बुटके यांना घरी जाऊन मारहाण केल्याचा आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, आमदारांविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या साईनाथ बुटके यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रात्री उशिरापर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला होता. यामुळे चिमूर येथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. (Chandrapur)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

Building Collapsed : मुंब्र्यात मध्यरात्री दुर्घटना, २५ वर्ष इमारतीचा सज्जा कोसळला, महिलेचा जागीच मृत्यू

GST Reforms: प्रत्येक घराघरात वापरणाऱ्या १५ वस्तू, १० दिवसांत होणार स्वस्त, सगळी यादी एका क्लिकवर

गृहमंत्र्यांचा राजीनामा, २१ जणांचा मृत्यू अन् सोशल मीडियावरील बंदी उठली, नेपाळमध्ये Gen-Z चं आंदोलन मागे

Lal Mathachi Bhaji Recipe : लाल माठाची भाजी आरोग्याला ठरेल फायदेशीर, नेहमी रहाल हेल्दी अन् फिट

SCROLL FOR NEXT