Chandrapur News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur News : शेतात काम करताना घडले भयंकर; मुसळधार पावसात विद्यूत तार तुटली, चौघांचा मृत्यू

Chandrapur News : चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर गावाच्या शेतशिवारात सदरची दुर्दैवी घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे.

संजय तुमराम

चंद्रपूर : विदर्भात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे, या पावसामुळे विद्युत तार शेतात तुटून पडली होती. याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने शेतात काम करण्यासाठी गेलेल्या चार शेतकऱ्यांना विजेचा जोरदार झटका बसून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. 

चंद्रपूरच्या (Chandrapur) ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर गावाच्या शेतशिवारात सदरची दुर्दैवी घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. जिल्ह्यात मागील दोन- तीन दिवसांपासून पाऊस सुरु होता. दरम्यान आज उघडीप असल्याने अनेक शेतकरी शेतात कामासाठी गेले होते. याच वेळी शेतात काम करीत असताना पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे व नानाजी राऊत या चार शेतकऱ्यांना तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श (Electric Shock) होऊन विजेचा जोरदार झटका बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 

पावसामुळे शेतात तार पडून 
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिवंत विद्युत तारा शेतात पडून राहिल्यामुळे सदरची घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान घटनेची माहिती गावात समजताच गावकर्यांनी शेताकडे धाव घेतली. तसेच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT