Chandrapur Congress Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur News : देवतळे दाम्पत्य काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित; पक्षविरोधी कारवायांचा ठपका

Chandrapur News : काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार गटाला मोठा हादरा आहे.

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. विजय देवतळे आणि त्यांच्या पत्नी डॉ. आसावरी देवतळे यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत हि कारवाई करण्यात आली. 

काँग्रेसकडून (Congress) करण्यात आलेल्या या कारवाईमुळे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार गटाला मोठा हादरा आहे. डॉ. विजय देवतळे हे माजी मंत्री दादासाहेब देवतळे यांचे चिरंजीव असून वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. तर आसावरी देवतळे या (Chandrapur) जिल्हा परिषदेच्या माजी सभापती आणि २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वरोरा विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. 

पक्षविरोधी कारवायांचा ठपका 

लोकसभा निवडणुका नुकताच पार पडल्या आहेत. दरम्यान या निवडुकीच्या काळात पक्षाचे काम न करता त्यांनी पक्षाविरुद्ध कारवाया केल्याचा ठपका देवतळे दाम्पत्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार गेल्यामुळे पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT