Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : गावात शिरलेल्या तीन बिबट्यांचे हल्ले; सहा जण जखमी

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात शिवनी वनपरिक्षेत्रात मोहाळी हे गाव आहे. हे गाव घनदाट जंगलाने वेढले आहे.

संजय तुमराम

चंद्रपूर : वनपरिक्षेत्र असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मोहाळी गावात शिकारीच्या शोधात बिबट्यांची प्रवेश केला होता. दरम्यान आज सकाळच्या सुमारास गावात घुसलेल्या तीन बिबट्यांनी नागरिकांवर हल्ला केला. यात सहा जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात शिवनी वनपरिक्षेत्रात मोहाळी हे गाव आहे. हे गाव घनदाट जंगलाने वेढले आहे. या भागात वन्य प्राण्यांचा अधिवास असल्याने अनेकदा गावात देखील वन्यप्राणी येत असतात. दरम्यान आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तीन बिबटे गावात आले. यावेळी गावातील नागरिक शेतीच्या कामावर जाण्यासाठी बाहेर पडले असतानाच या बिबट्यानी लोकांवर (Leopard Attack) हल्ले केले. यात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. 

एक बिबट्या जेरबंद 

बिबट्याने हल्ला केल्यानंतर यात विजय देवगिरीकर, मनोहर दांडेकर, जितेंद्र दांडेकर, सुभाष दांडेकर, ऋतिक वाघमारे, पांडुरंग नन्नावरे यांचा समावेश आहे. हल्ला केल्यानंतर हे बिबटे गावातील घरांत शिरले असून (forest department) वन विभागाने तातडीने दखल घेत बिबट्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली. आतापर्यंत एक बिबट्या जेरबंद झाला असून, उर्वरित दोन बिबटे पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0: खुशखबर! आता PFचे पैसे UPI ने मिनिटात खात्यात जमा होणार, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Soft Skin Tips: मऊ आणि मुलायम त्चचेसाठी रात्री चेहऱ्यावर काय लावावे?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची eKYCची मुदत वाढवली; मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली २ कारणे

Pune Rain: पुण्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले, रस्त्यांना नदीचे स्वरूप; पाहा VIDEO

Celebrity Style Mangalsutra: सेलिब्रिटीस्टाईल शॉ्र्ट आणि युनिक मंगळसूत्र हवेत? हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT