Chandrapur News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur News : अत्याचार झालेल्या महिलेने केले पाेलिस स्टेशनमध्येच विष प्राशन

अत्याचार झालेल्या महिलेने पोलीस स्टेशनमध्येच केले विष प्राशन; वरोरा पोलीस स्टेशनमधील प्रकार

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात बलात्कार पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्येच विष घेतले. वरोरा पोलिस (Police) स्टेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. अत्याचार करणाऱ्या आरोपीला जमीन मिळाल्यानंतर त्यांना मदत (Chandrapur) करणारे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश चौरे यांच्यावर कारवाई करावी; या मागणीसाठी सादर महिलेने विष घेतले. (Live Marathi News)

पीडित महिला अंदाजे ३६ वर्षांची असून तिने ऑक्टोबर २०२२ मध्ये आरोपी इरफान शेख विरुद्ध बलात्काराची तक्रार (Crime News) दिली होती. आरोपीवर ३७६ आणि एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक झाली होती. मात्र या प्रकरणात आरोपीला जामीन मिळाल्यावर आरोपी आणि त्याचे नातलग त्रास देत असल्याचा पीडित महिलेचा आरोप होता. सोबतच आरोपींना वरोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चौरे मदत करत (Warora) असल्याचा आरोप देखील महिलेने केला होता. 

आरोपींना मदत करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक निलेश चौरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत महिलेने वरोरा येथे पत्रकार परिषद घेतली होती. मात्र चौरे यांच्यावर कारवाई न झाल्याने महिलेने वरोरा पोलीस स्टेशनमध्येच विष घेतले. महिलेला प्रथम वरोरा उपजिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

पुण्यात अवघ्या १३ लाखांत हक्काचं घर, म्हाडाचा ४४६२ फ्लॅटचा धमाका, लोकेशनची नावं समोर, वाचा A टू Z माहिती

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

SCROLL FOR NEXT