Chandrapur Bridge Collapse saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Bridge Collapse: बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला; शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

Chandrapur News : चंद्रपुरात मोठी दुर्घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी ४:५५ च्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ४८ वयाच्या नीलिमा रंगारी नावाच्या शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. नीलिमा या बल्लारपूर येथील रहिवासी आहेत. नीलिमा यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळली आहे.

या घटनेतील काही गंभीर जखमींना चंद्रपूर (Chandrapur) शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वेने सध्या गंभीर जखमीना १ लाख तर किरकोळ जखमींना ५० हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे. काही वेळात विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे बल्लारपूर रेल्वेस्थानकावर पोचणार असून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. फलाट क्रमांक 1 वरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार घटनास्थळी भेट देणार आहेत.

जखमींची नावे खालीलप्रमाणे आहेत. 

अतिदक्षता विभागातील रूग्‍ण 

1. रंजना खरतड, वय 55 वर्ष 

रूग्‍णालयातील इतर वार्डमध्‍ये भरती रूग्‍ण 

१. छाया भगत, 45 वर्ष, 12 नं, वार्ड 

२. निधी भगत, 21 वर्ष, 11 नं. वार्ड 

३.चैतन्‍य भगत, 18 वर्ष, 19 नं. वार्ड

४.साची पाटिल, 29 वर्ष, 12 नं. वार्ड

५.अंजली वर्मा, 21 वर्ष, 12 न. वार्ड 

रूग्‍णालयातून उपचार करून घरी पाठ‍वलेल्‍यांची नावे 

६. प्रिया खरतड, 28 वर्ष 

७.अनुराग खरतड, 30 वर्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळांच्या विजयाचा मोठा जल्लोष; जेसीबीतून फुलांचा वर्षाव

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT