Chandrapur News  Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur News : दुर्दैवी! अस्थी विसर्जनादरम्यान एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

दुर्दैवी! अस्थी विसर्जनादरम्यान एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

Satish Kengar

Chandrapur News :

चंद्रपूर जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथील बल्लारपूर तालुक्यातल्या नांदगाव येथे एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे तिघेही अस्थि विसर्जन करण्यासाठी नदीत गेले होते, त्यावेळी त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव येथे पोडे कुटुंबातील घनशाम पोडे यांचे ११ नोव्हेंबर रोजी निधन झालं होतं. त्यांच्याच स्थिविसर्जनआज वर्धा - इरई संगमावर करण्यासाठी त्यांचा मुलगा आणि भाचा नदीत गेले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नदीचा प्रवास जास्त असल्याने हे दोघे वाहून जात असताना गोविंदा पांडुरंग पोडे यांनी नदी पात्रात उडी घेतली आणि या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न करू लागेल.  (Latest Marathi News)

मात्र नदीचा प्रवास इतका अधिक होता की, तेही त्यात वाहून गेले आणि यातच तिघांचं बुडून मृत्यू झाला. गोविंदा पांडुरंग पोडे ( ४७), चेतन गोविंदा पोडे ( १६ ) आणि गणेश रवींद्र उपरे ( १७) अशी मृतांची नावे आहेत.

मृत गोविंदा पोडे हे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आहेत. गोविदा पोडे हे बल्लारपूर पंचायत समितीचे देखील माजी सभापती होते. एकाच कंटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे पंचक्रोशित शोककळा पसरली आहे. बुडालेल्या तिघांपैकी दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र गोविंदा पोडे यांचा शोध अद्याप सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावर उद्या अंतिम निकाल, आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेपेची शिक्षा?

६६१ कोटा घोटाळा प्रकरण; निवृत्तीच्या ४ दिवसाआधी IAS अधिकारी फरार, मोबाईलही बंद

मुसळधार पावसाने उडवली धांदल; यवतमाळ-बुलढाणा-वाशिममध्ये पूरसदृश्य स्थिती

Crime News: आजारी पत्नीला औषधाऐवजी पाजलं विष; पाच महिन्यांनंतर उलगडलं हत्येचं गूढ, पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT