उध्दव ठाकरेंनी मुंबई महापालिकेतील अपयशानंतर केलेल हे वक्तव्य. मात्र चंद्रपूर महापालिकेत भाजप आणि ठाकरेसेनेमध्ये अगदी शेवटच्या क्षणी झालेली युती पाहता या वक्तव्यावरून ठाकरे सेनेने एका महिन्याच्या आतच घुमजाव केलं आहे..चंद्रपूर महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यानं सत्तेचं गणित चांगलचं रेंगाळलं होतं.मात्र ऐनवेळी भाजपनं ठाकरेसेनेला सोबत घेतलं आणि पालिकेवर भगवा झेंडा फडकवलाय...
सव्वा सव्वा वर्षांच्या फॉर्म्युल्यावर भाजपच्या संगीता खांडेकर महापौर, तर ठाकरे सेनेचे प्रशांत दानव हे उपमहापौर झालेत... या दोघांनाही 32 मतं मिळाली...महापौर पदासाठी ठाकरेसेना आग्रही असताना काँग्रेसनं त्याचं मन वळवण्याचा फारसा प्रयत्न केला नाही आणि कॉग्रेसच्या हातातोंडाशी आलेला घास भाजपनं हिरावून घेतला तो ही ठाकरेसेनच्या मदतीने..
राज्याच्या राजकारणात भाजपविरोधी असलेली ठाकरेसेना चंद्रपूर महापालिकेत भाजपला वळचणीला गेली..दुसरीकडे वंचित आणि एमआयएमनेही तटस्थ राहून एकप्रकारे भाजपला समर्थन दिल्यांचच चित्र आहे. महापौर निवडणुकीत भाजपचे 23, शिंदेसेनेचा 1, ठाकरेसेनेचा 7 आणि अपक्ष 1 असे 32 मतांनी भाजपनं सत्तास्थापन केलीय.. तर काँग्रेसला 27, जनविकास सेनेला 3 बसपाला 1 मतं मिळालेत...ज्यामुळे फक्त एक मतासाठी काँग्रेसचं महापौरपदाचं स्वप्न अधुरं राहिलयं...
दरम्यान, घूमजाव करणाऱ्या ठाकरेसेनेच्या या दुटप्पीपणावर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे... चंद्रपूर महापालिकेत धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या गटातील धुसफुशीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता...अशातच एमआयएम आणि वंचितसोबतच्या अंतर्गत वादात समेट घडवून आण्यात काँग्रेसला अपयश आल्यानं दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा मात्र लाभ झालाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.