Chandrapur Crime Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur Crime: धक्कादायक! शाळेमध्येच शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, चंद्रपूर हादरले

Chandrapur Police: चंद्रपूरमध्ये शिक्षकाने ११ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेमध्येच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. ही घटना पीडित मुलीने आपल्या मैत्रीणीला सांगितल्यानंतर उघड झाली.

Priya More

संजय तुमराम, चंद्रपूर

चंद्रपूरमध्ये शिक्षकाने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुंगीच्या गोळ्या देऊन या विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे. शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी शिक्षक काँग्रेसचा पदाधिकारी असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या ११ वर्षांच्या मुलीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले. यासंबंधीची तक्रार पीडीतेने कोरपना पोलिसात केली असून शिक्षकाविरोधात पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार शिक्षकाला आज पहाटे अकोल्यातून अटक करण्यात आली. ही घटना मे महिन्यातील असून याची तक्रार मंगळवारी करण्यात आली.

पीडित मुलगी एक्स्ट्रा क्लास करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये शाळेत जात होती. इतरही विद्यार्थी या वर्गाला यायचे. आरोपी शिक्षक अमीत लोडे हा वर्ग घ्यायचा. एक दिवस त्याने पीडित मुलीला कार्यालयात बोलावून तिला गुंगीच्या गोळ्या दिल्या आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलगी शुद्धीवर आल्यावर तिने घडलेली गोष्ट घरी सांगू नये म्हणून त्याने तिला धमकावले. त्यामुळे ही मुलगी गप्प राहिली.

पण पीडित मुलीने हा प्रकार वर्गातील मैत्रिणीला सांगितला होता. या मैत्रिणीने तिच्या आईला हा प्रकार आता सांगितल्यावर पीडितेच्या आईने मंगळवारी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून आरोपी शिक्षकाविरोधात पॉक्सो आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसामध्ये तक्रार झाल्यानंतर हा शिक्षक फरार झाला होता. मात्र आज पहाटे त्याला अकोला येथून अटक करण्यात आली. आरोपी शिक्षक हा कोरपना येथे युवक काँग्रेसचा पदाधिकारी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार, मोदींच्या हस्ते उद्घाटन; कुठून-कुठे असणार प्रवास

Maharashtra News Live Update: माणगावच्या देवकुंड धबधब्यात दोन पर्यटक बुडाले

Palghar Fort : शौर्य अन् इतिहासाचा अनमोल वारसा, पालघरमध्ये वसलाय 'हा' भव्य किल्ला

Sleeping Problems: रोज ६ तासांपेक्षा कमी झोपता? शरीरावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

Chanakya Niti : ऑफिसमध्ये जळणारे सहकारीही करतील कौतुक! चाणक्यांच्या या ७ नीती ठरतील यशाची गुरुकिल्ली

SCROLL FOR NEXT