Chandrapur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Crime News : निलंबित पोलिसाने केला वर्ग मैत्रिणीचा खून; कॉल रेकॉर्डवरून लागला शोध

Chandrapur News : नरेश व अरुणा हे दोघेजण एका वर्गातील मित्र- मैत्रीण होते. अरुणा हि चिमूर येथे देवांश जनरल स्टोअर्स हे दुकान चालवायची. दुकान असल्यानेमुळे अरुणा हि सामान आणण्यासाठी नेहमी नागपूरला जात असे.

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील बेपत्ता महिलेचा अखेर मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह नागपूर शहराजवळील हरिश्चंद्रवेळा गावाजवळ निर्जनस्थळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलीसांनी तपास करत मृत महिलेचा वर्गमित्र नरेश डाहुले यानेच हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

नागपूर शहराजवळ मृतावस्थेत आढळून आलेल्या अरुणा काकडे (वय ३७) असे मृत महिलेचे नाव आहे. तर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतून पोलीस कर्मचारी असलेला नरेश डाहुले हा निलंबित झाला होता. नरेश व अरुणा हे दोघेजण एका वर्गातील मित्र- मैत्रीण होते. अरुणा हि चिमूर येथे देवांश जनरल स्टोअर्स हे दुकान चालवायची. दुकान असल्यामुळे अरुणा हि सामान आणण्यासाठी नेहमी नागपूरला जात असे. 

नागपूरला जात असल्याने अरुणा हि आपला वर्गमित्र नरेश याला नेहमी भेटत असे. दरम्यान २६ नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केटमध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी अरुणा हि गेली होती. २६ नोव्हेम्बरला मृत अरुणा आणि संशयित आरोपी नरेश हे नागपूरला एकत्र होते. सामान घेण्यासाठी अरुणा हि गावी परतलीच नाही. यामुळे कुटुंबियांनी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 

दरम्यान अरुणा व नरेश यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. त्यानुसार २६ नोव्हेंबरला दोघे नागपूरला भेटले असताना दोघांमधील पुन्हा वाद झाला. दोघांमधील हा वाद विकोपाला गेला आणि संशयित आरोपी नरेश याने अरुणाचा गळा दाबून हत्या केली. नरेश डाहुलेचा चंद्रपूर शहरातील अनेक घरफोड्यांमध्ये समावेश असल्याने त्याला वर्षभरापूर्वी निलंबित केले गेले होते. 

तर अरुणाच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नागपूर आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास केला. यात निलंबत पोलीस कर्मचारी नरेश डाहुले याने अरुणाचा खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कॉल रेकॉर्डच्या मदतीने संशयित आरोपी नरेश याचा शोध घेतला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आणखी तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT