Chandrapur Firing Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Crime News: बँकेच्या अध्यक्षांवर अंदाधुंद गोळीबार; गोळ्या झाडून आरोपी फरार

या घटनेत संतोष रावत यांना कोणतीही इजा झाली नसली तरी गोळी त्यांच्या हाताला घासून गेली आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

Chandrapur Firing News: चंद्रपूर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर काल अज्ञात इसमांनी गोळी झाडली. या घटनेत संतोष रावत यांना कोणतीही इजा झाली नसली तरी गोळी त्यांच्या हाताला घासून गेली आहे. सदर घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मूल शाखेच्या परिसरात ही घटना घडली. गोळीबार करणारा व्यक्ती कोण होता याची माहिती अजून मिळालेली नाही. गोळी झाडल्यानंतर तो फरार झाला आहे. संतोष रावत यांच्यावर गोळीबार का करण्यात आला? कोणत्या हेतूने करण्यात आला? कोणी केला?, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केलाय. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

मुंबईच्या (Mumbai) मानखुर्द येथे देखील ३० एप्रिल रोजी गोळीबाराची (Firing) मोठी घटना घडली होती. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. शेजारच्यांशी झालेल्या वादातून महिलेवर गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आली होती. हल्ला केल्यानंतर घटनेतील दोन्ही आरोपी फरार होते. या आरोपींना शोधण्यात पोलिसांना आता यश आलं आहे.रविवारी रत्नागिरी येथून गोळीबार करणाऱ्या सोनू सिंह (४२) आणि अतिष सिंह (२२) याना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT